खासदार निलेश लंके यांच्या आरोपाने पोलीस दलात खळबळ
अहमदनगर : दि.25 नगरच्या स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबीकडून) दरमहा 27 कोटी 60 लाखांचे हप्ते वसुली केली जात असल्याचा गंभीर आरोप खासदार निलेश लंके यांनी केला आहे.
नगर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून दरमहा 27 कोटी 60 लाख रूपयांचे हप्ते वसुल करण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती खासदार निलेश लंके यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी लंके यांनी पोलीस वसुल करीत असलेल्या हप्त्यांचे रेटकार्डच जाहिर केले.गेल्या तीन दिवसांपासून खा.निलेश लंके जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर या संदर्भात उपोषणास बसले आहेत.
खा. लंके यांनी जाहीर केलेले पोलीसांचे रेट कार्ड (पोलिसांचा अर्थसंकल्प)
चंदन तस्करी, रेशनिंग – 40 लाख
हिरा गुटखा – 68 लाख
विमल गुटखा – 60 लाख
आरएमडी गुटखा – 25 लाख
नगर शहर कॅफे – 50 लाख
वाळू ट्रॅक्टर – 2 कोटी 50 लाख
वाळू गाडी – 4 कोटी 80 लाख
जेसीबी – 1 कोटी 40 लाख
पोकलेन – 50 लाख
आयपीएल सट्टा – 50 लाख
वेश्या व्यवसाय हॉटेल – 30 लाख
इतर अवैध व्यवसाय – 55 लाख
मटका – 7 कोटी 55 लाख
बिंगो – 1 कोटी 40 लाख
मावा – 3 कोटी 30 लाख
दारू हॉटेल – 75 लाख
डिझेल, पेट्रोल तस्करी – 12 लाख 50 हजार
ट्रक रिक्षा – 10 लाख
जुगार – 75 लाख