बीड दि. 1 : नांदेड जिल्ह्यातील मुदखेड नगर परिषदेचे माजी मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली बीड जिल्ह्यात करण्यात आली आहे. फडसे हे बीड नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदाची धुरा सांभाळणार असून, १ ऑगस्ट २०२५ रोजी त्यांना सध्याच्या पदावरून मुक्त करण्यात येणार आहे. त्यांना ४ ऑगस्ट २०२५ पर्यंत नवीन पदावर रुजू होण्याचे आदेश देण्यात आले असून, रुजू झाल्यानंतर सरकारला तात्काळ अनुपालन अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. (Beed co neeta andhare transfar)
दरम्यान, सध्या बीड नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या श्रीमती नीता अंधारे यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या कार्यकाळात नगर परिषदेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार असून, त्यानंतरच ही प्रशासकीय बदलाची कारवाई करण्यात आली आहे. या बदलामुळे बीड नगर परिषदेत प्रशासनिक कामकाजात काही प्रमाणात बदल अपेक्षित असून, नगर परिषदेच्या विविध प्रलंबित कामांना गती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

