दत्ता देशमुख : बीड
दि. 29 : 1978 साली स्थापन झालेल्या मराठवाडा पदवीधर मतदार संघात मराठवाड्यासह धुळे, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांचा समावेश होता. पण, 1984 साली स्वतंत्र मराठवाडा पदवीधर मतदार संघाची निर्मिती झाली आणि पहिल्या निवडणुकीत कॉंग्रेसचे दिवंगत वसंतराव काळे यांनी विजय मिळविला. पुढच्या निवडणुकीत जयसिंगराव गायकवाड यांनी दिवंगत काळेंचा पराभव करुन या मतदार संघात भाजपचा झेंडा फडकविला. पुढे भाजपचे श्रीकांत जोशी यांचा पराभव करुन आमदार सतीश चव्हाण यांनी १८ वर्षे (18 years) या मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले. त्यांचा राजकीय (political) प्रवासही नवखा उमेदवार ते हुकमी एक्का असाच राहीला. पण, या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या विजयाने राजकीय गणिते बदलली. (Marathwada Graduate Constituency Election History | Satish Chavan vs Dr. Pratapsingh Patil)
सध्या आठ जिल्हे आणि 78 तालुके असलेला मतदार संघ एकदम विस्तीर्ण आहे. या मतदार संघातून विजयासाठी पदवीधर (gradutes) मतदारांची नाेंदणी, संपर्क, सत्तास्थाने आणि संस्थांचे जाळे असे समिकरण मांडले जाते. दरम्यान, 1984 साली स्वतंत्र मराठवाडा पदवीधर मतदार संघाची निर्मिती झाल्यानंतर सर्वप्रथम कॉंग्रेसचे (congress) दिवंगत मातब्बर नेते वसंतराव काळे यांनी भाजपच्या सुरेश हिरेंचा पराभव केला. मात्र, 1990 साली जयसिंगराव गायकवाड यांनी दिवंगत काळेंचा केलेला पराभव हा मरावाड्याच्या राजकारणातील मोठी घडामोड मानली गेली. त्या काळात मराठवाड्यातील बहुतांशी सत्तास्थाने कॉंग्रेसच्या ताब्यात आणि भाजप राजकीय ताकदीने दुबळी होती. पण, जयसिंगराव गायकवाड राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (rss) मुशीतून तयार झालेले फर्डे वकृत्व आणि संघटन कौशल्य असलेले नेते होते. त्यांच्यामागे दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे (gopinathrao munde) यांची ताकद आणि दिवंगत प्रमोद महाजन यांची रणनिती होती. जयसिंगरावांनी दोन वेळा या मतदार संघातून प्रतिनिधित्व केले. याच आमदारकीतून त्यांना राज्याच्या मंत्रीमंडळातही राज्यमंत्री म्हणून संधी मिळाली. मात्र, त्यांची मराठवाडा पदवीधर मतदार संघातील आमदारकीची मुदत संपण्यापूर्वी पक्षाने त्यांना 1998 च्या लोकसभा निवडणुकीची उमेदवारी दिली. या निवडणुकीतील विजयामुळे त्यांनी पदवीधर मतदार संघाच्या आमदारकीचा राजीनामा दिला. नंतरच्या पोटनिवडणुकीत पुन्हा दिवंगत वसंतराव काळे विजयी झाले. त्यांनी भाजपचे संजय निंबाळकर यांचा पराभव केला. त्यानंतर 2002 साली भाजपला पुन्हा या मतदार संघात विजयाचा झेंडा फडकवण्याची संधी मिळाली. दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या राजकीय कौशल्याच्या बळावर श्रीकांत जोशी यांनी विजय मिळविला. पण, पुन्हा 2008 पासून या मतदार संघात सतीश चव्हाण (satish chavan) यांची एंट्री झाली आणि त्यांनी सलग तीन टर्म म्हणजे 18 वर्षे (18 years) या मतदार संघातून प्रतिनिधित्व केले.
नवखा उमेदवार ते मतदार संघाचा हुकमी एक्का
मुळ तुळाजापुर तालुक्यातील सतीश चव्हाण हे जेष्ठ व मातब्बर नेते डॉ. पद्मसिंह पाटील यांचे विश्वासू. डॉ. पाटील यांचे पदड्याआडची राजकीय सुत्रे चव्हाणच सांभाळत. अभियंता असल्याने ठेकेदारी त्यांचा मुळ व्यवसाय. मात्र, राजकारणात त्यांचे मोठे नावही नव्हते आणि मराठवाडाभर (marathwada) फारशी ओळखही नव्हती. मात्र, डॉ. पाटील व पवारांचे संबंधामुळे अनेक मातब्बर इच्छुकांना डावलून 2008 साली सतीश चव्हाण यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली. त्यांनी भाजपचे श्रीकांत जोशी यांचा पराभव केला. त्यानंतर त्यांनी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळात (marathwada education society) लक्ष घालून मधुकरराव मुळेंची एमएसपीमधील सद्दी संपवली. 2014 सालच्या निवडणुकीत देशात मोदींचा आणि राज्यात भाजपचा डंका असतानाही सतीश चव्हाण यांनी भाजपच्या शिरीष बोराळकर यांना पराभवाची धुळ चारुन दुसऱ्यांदा विजय मिळवला. त्यांनी स्वत: मतदान नोंदणीसाठी केलेले प्रयत्न, मराठवाडाभर विस्तार असलेल्या एमएसपीची यंत्रणा आणि सर्वच पक्षांतील नेत्यांबरोबर व्यक्तीगत संबंध ही त्यांच्या विजयासाठी महत्वाच्या बाबी ठरल्या. पुढे 2020 मध्येही त्यांनी याच बळावर पुन्हा एकदा शिरीष बोराळकरांवर विजय मिळवला. त्यामुळे मतदार संघातील हुकमी एक्का अशी त्यांची ओळख निर्माण झाली. यावेळी मात्र त्यांच्या या सर्व जमेच्या बाजू त्यांच्यावर उलटल्याचे चित्र आहे. १८ वर्षांची अॅंटी इन्कमबसी आणि त्यांच्यासह सरकारवरील नाराजीमुळे चव्हाण पिछाडीवर गेले आणि राजकीय ताकदीने दुबळ्या असलेल्या राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (nationalist congress party sharadchandra pawar paksh) डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी त्यांच्यावर विजय मिळविला.

