अनमोल मित्तल अंबाजोगाईचेनवे अपर पोलीस अधीक्षक

बीड

चेतना तिडके यांची नागपूरला बदली

बीड : अंबाजोगाईचे अपर पोलीस अधीक्षक म्हणून अनमोल मित्तल (भापोसे) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अंबाजोगाईच्या विद्यमान अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांची नागपूर येथे बदली करण्यात आली असून, त्यांच्याकडे पोलीस अधीक्षक (अभियान, अंमली पदार्थविरोधी) पथकाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यासंदर्भातील आदेश गृह विभागाने २ नोव्हेंबर रोजी काढला आहे.

मित्तल हे २०२१ च्या तुकडीचे महाराष्ट्र केडरमधील भारतीय पोलीस सेवा (आयपीएस) अधिकारी आहेत. त्यांनी यापूर्वी पुणे ग्रामीणमधील हवेली पोलीस ठाण्यात प्रभारी अधिकारी म्हणून काम केले. त्यानंतर अकोट येथे सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळली. पुढे त्यांची ठाणे ग्रामीण येथे अपर पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली आता त्यांच्या नियुक्तीनंतर अंबाजोगाई विभागातील कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे आणि नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करणे या बाबींवर त्यांच्या कार्यकाळात कसा भर दिला जातो, याकडे लक्ष लागले आहे.

Tagged