पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मोठी घोषणा ! वादग्रस्त तिन्ही कृषी कायदे रद्द!!

नवी दिल्ली– गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला मोठं यश मिळालं आहे. तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसलेल्या शेतकऱ्यांच्या मागण्यांपुढं अखेर सरकारला झुकावं लागलं आहे. तिन्ही कृषी कायदे मागे घेत असल्याची घोषणा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, मी देशवासियांची क्षमा मागतो. आमच्या तपस्येतच […]

Continue Reading
corona

तुम्हाला महितीयेत का जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण किती?

बीड– बीड जिल्ह्यात मागील महिनाभरापासून कोरोना रुग्णांत मोठी घट झाली आहे. आता हा आकडा जवळपास एक आकडी आला आहे. जिल्हा प्रशासनाने आज जाहीर केलेल्या अहवालानुसार बीड जिल्ह्यात केवळ सहा रुग्ण आढळून आले आहेत. आज एकूण 360 जणांचे नमुने अंबाजोगाईच्या लॅबमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. जिल्ह्यातील धारूर परळी तालुक्यात प्रत्येकी दोन तर आष्टी आणि गेवराई तालुक्यात […]

Continue Reading
MHAIS

म्हशीला कोणीतरी करणी केली म्हणत शेतकरी ठाण्यात घेऊन आला म्हैस

भिंड, दि. 13 : आपल्या म्हशीला कोणीतरी करणी केली आहे, त्यामुळे तिने दूध देणे बंद केले, अशी तक्रार घेऊन एक शेतकरी थेट आपल्या म्हशीला घेऊन पोलीस ठाण्यात दाखल झाला. शेतकर्‍याच्या या विचित्र तक्रारीनंतर पोलीसही हैरान झाले. ही घटना मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यातील घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या शेतकर्‍याने एक संशय व्यक्त केला आहे. म्हशीवर कोणीतरी […]

Continue Reading
vaijenathrao shinde

कर्मवीर वैजेनाथराव शिंदे यांचे निधन

माजलगाव- माजलगाव तालुक्यातील लवूळ येथील गजानन शिक्षण मंडळाचे संस्थापक तथा विद्यमान सचिव वैजेनाथराव रंगनाथराव शिंदे यांचे मंगळवारी (दि. 2 नोव्हेंबर) रोजी वृध्दपकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी ते 94 वर्षांचे होते. वैजेनाथराव शिंदे यांनी लवूळ आणि परिसरातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून 1963 साली गजानन शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली होती. त्याचबरोबर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृहाची देखील सोय […]

Continue Reading
deglur asembly by election

देगलुरच्या पोट निवडणुकीत काँग्रेस उमेदवार विजयी

नांदेड- देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. अंतापूरकर यांनी भाजप उमेदवार सुभाष साबणे यांचा तब्बल 41 हजार 933 मतांनी पराभव केला आहे. काँग्रेस नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यासाठी भाजपकडून प्रयत्न केले जात होते. त्यामुळे चव्हाण यांनीही ही निवडणूक प्रतिष्ठेची करत देगलूरमध्ये […]

Continue Reading
anil deshmukh

गायब झालेले अनिल देशमुख ईडी कार्यालयात हजर

मुंबई, दि. 1 : राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख हे गेल्या काही महिन्यांपासून गायब झालेले होते. आज (1 नोव्हेंबर) अनेक दिवसांनंतर अनिल देशमुख स्वतः ईडी कार्यालयात हजर झालेत. तसेच त्यांनी या प्रकरणावर आपली बाजू मांडणारा व्हिडीओ ट्वीट केलाय. त्यांनी आपलं शेवटचं ट्वीट 2 जुलैला केलं होतं. त्यानंतर आज त्यांनी ट्विटरवर आपली […]

Continue Reading
mark zukerberge

सहा तासात झुकेरबर्गला तब्बल ‘इतके’ हजार कोटी रुपयाचा फटका

नवी दिल्ली दि.5 : फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप आणि इन्स्टाग्रामची सेवा तब्बल सहा तासांसाठी ठप्प झाल्याने तसेच एका जागल्याने (व्हिसलब्लोअरने) कंपनीसंदर्भात केलेल्या धक्कादायक आरोपांमुळे फेसबुक कंपनीचा संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्गला मोठा आर्थिक फटका बसलाय. सोमवारी उडालेल्या गोंधळामुळे मार्कला 600 कोटी डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनानुसार 4,47,34,83,00,000 रुपयांचं (44 हजार कोटी रुपयांचं) नुकसान झालं आहे. समोर […]

Continue Reading
nathsagar

नाथसागरातून पाण्याचा विसर्ग सुरु

चंद्रकांत अंबिलवादे । पैठणदि.29 : जायकवाडी प्रकल्प अर्थात नाथसागर जलाशय पूर्ण क्षमतेने भरण्याकडे वाटचार करीत आहे. त्यामुळे बुधवार (दि. 29) रोजी या प्रकल्पाच्या 4 दरवाजांवाटे पाणी सोडण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, तहसीलदार चंद्रकांत शेळके, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव, नगरपरिषद मुख्याधिकारी संतोष आगळे, गटविकास अधिकारी ओमप्रकाश रामावत, धरण शाखा अभियंता विजय काकडे यांची […]

Continue Reading
MHT-CET 2021

पावसामुळे एमएचटी-सीईटी MHT-CET 2021 हुकलेल्यांना पुन्हा एकदा परीक्षा देता येणार

मुंबई, दि.29 : राज्यात विविध केंद्रांवर अभियांत्रिकी, फार्मसी अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा एमएचटी-सीईटी सुरू आहे. पावसामुळे मराठवाड्यासह अन्य अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचता आले नाही. या सर्व विद्यार्थ्यांना उच्च व तंत्र शिक्षण विभागाने दिलासा दिला आहे. या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देता येणार आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यासंबंधी ट्विट केले […]

Continue Reading
subhash sarda

सुभाष सारडांच्या द्वारकादास मंत्री बँकेवर प्रशासक

बीड, दि.25 : बीड जिल्ह्याला आर्थिक क्षेत्रात पुन्हा एकदा जोरदार हादरा बसला आहे. येथील द्वारकादास मंत्री बँकेत 2019-20 मध्ये झालेल्या प्रशासकीय अनियमततेबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडीयाने राज्याच्या सहकार विभागाला आदेश देत बँकेवर प्रशासक नेमण्याची सुचना केली. त्यानुसार सहकार आयुक्तांच्या आदेशाने बीडचे जिल्हा उपनिबंधक विश्वास देशमुख यांची बँकेवर प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आली. देशमुख यांनी पदभार […]

Continue Reading