pm-kisan-sanman-nidhi-yojan

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीत 25 कोटींचा घोटाळा

जिल्हाधिकार्‍यांचे चौकशीचे आदेश : अ‍ॅड.अजित देशमुख बीड : पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना 2018 मध्ये चालू करण्यात आली. शेतीवर सातत्याने येणार्‍या आपत्तीमुळे शेतकरी परेशान होता. त्यामुळे या योजनेअंतर्गत शेतकर्‍यांना आर्थिक सहाय्य देण्याच्या उद्देशाने निकष ठरवून त्या निकषात बसणार्‍या शेतकर्‍यांना प्रतिवर्षी सहा हजार रुपये प्रमाणे निधी त्यांच्या बँक खात्यात जमा करून दिला जातो. मात्र जिल्ह्यात या […]

Continue Reading
mansoon

राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज

मुंबई : येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये मोसमी वारे कर्नाटक आणि गोवा ओलांडून तळकोकणातून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. सहा राज्यात 9 ते 11 जून दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. ओदिशा, आंध्र प्रदेश, तेलंगण, गुजरात, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र या राज्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. निसर्ग चक्रीवादळामुळे […]

Continue Reading

व्यवस्थेचं अपयश; देव लागला द्यायला अन् पदर नाही घ्यायला

जागेअभावी माजलगावात कापूस खरेदी बंद, शासकीय खरेदी केंद्रांमध्येच खासगी खरेदी-होकेमाजलगाव ः देव लागला द्यायला अन् पदर नाही घ्यायला अशी अवस्था सध्या राज्य व केंद्र सरकारची झाली आहे. कारण शेतकर्‍याचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी शासन दरवर्षी नवनव्या योजनांची घोषणा करते. मात्र दुसरीकडे शेतकर्‍यांनी घाम गाळून पिकवलेला माल खरेदी करायला सुद्धा सरकार कमी पडत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांसाठी होणार्‍या […]

Continue Reading

शेतकरी फरफट : नगदी पिकांची उधार खरेदी थांबणार कधी?

शासकीय खरेदी केंद्रावर कापूस, तूर, हरभरा उत्पादकांचे अतोनात हाल, माल विक्री करुनही मिळत नाही वेळेत पैसाबीड : शेतकर्‍यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी शासनस्तरावरुन विविध योजनांची घोषणा केली जाते. मात्र शेतकर्‍यांनी स्वतःच्या कष्टातून पिकवलेल्या शेतीमालाची खरेदी करण्यात सरकार अपयशी ठरत असल्याचं सिद्ध होत आहे. दरवर्षी शेतीमाल खरेदी करतांना सरकारकडून शेतकर्‍यांची पिळवणूक व अडवणूक केली जात आहे. तर […]

Continue Reading
Shilpa Shetty

वडिलांच्या इच्छेविरोधात शिल्पा शेट्टीने केलं होतं कलाविश्वात पदार्पण

आपल्या अभिनयाने आणि नृत्य कौशल्याने प्रेक्षकांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे शिल्पा शेट्टी. केवळ बॉलिवूडचं नव्हे तर सोशल मीडियावरही शिल्पाने तिचा दबदबा निर्माण केला आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये ती कायम चर्चेत असते. कलाविश्वात स्वतंत्र स्थान मिळवणार्‍या या अभिनेत्रीने वडिलांच्या मनाविरुद्ध या क्षेत्रात पदार्पण केल्याचं म्हटलं जात आहे. उत्तम अभिनयाच्या जोरावर शिल्पाने कलाविश्वात तिचं स्वतंत्र स्थान निर्माण केलं […]

Continue Reading

माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकर्‍यांची अडवणूक

कापूस घ्यायचा नव्हता तर नोंदणी का करुन घेतली, प्रशासनाच्या मनमानीमुळे शेतकर्‍यांचे नुकसानमाजलगाव ः कधी निसर्गामुळे तर कधी सरकारी धोरणांमुळे शेतकरी मेटाकुटीला येत आहे. दुसर्‍या वर्षीचा खरीप हंगाम सुरु झाला तरी पहिल्या गतवर्षीची कापूस, तुर घरात पडून आहे. ती विक्री करण्यासाठी शेतकरी गयावया करत असतांना प्रशासनाकडून मात्र शेतकर्‍यांची गळचेपी केली जात आहे. माजलगाव कृषी उत्पन्न बाजार […]

Continue Reading

एचडी देवेगौडा राज्यसभा निवडणूक लढवणार

माजी पंतप्रधान व जनता दल सेक्युलर (जेडीएस) चे सर्वेसर्वा एचडी देवेगौडा पुन्हा एकदा राजकीय आखाड्यात उतरणार आहेत. वयाच्या ८७ व्या वर्षी ते पुन्हा एकदा देशाच्या राजकारणात सक्रीयरित्या दिसणार आहेत. पक्षातील आमदार, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व अन्य नेत्यांच्या आग्रहाखातर ते आगामी राज्यसभा निवडणूक लढवणार आहेत. शिवाय, त्यांचा राज्यसभेत पोहचण्याचा मार्ग यामुळे मोकळा झाल्याचेही दिसत आहे. […]

Continue Reading
accident

जीपच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू

गेवराई: तालुक्यातील तळेवाडी फाट्याजवळ  जीप आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली. गुरुवारी (दि.4) सायंकाळी घडलेल्या या अपघातात दुचाकीवरील दोन जणांचा गंभीर जखमी झाले. जिल्हा सामान्य रुग्णालयात रात्री 12.25 दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी रुग्णालय पोलीस चौकीत नोंद करण्यात आली आहे.        पोलीसांच्या माहितीनुसार, गणेश बबन देशमुख (22) व सचिन विष्णू भोसले (21, दोघे रा.पुरुषोत्तमपुरी, ता.माजलगाव) अशी मयतांची नावे आहेत.  पिकअप जीप (एम.एच.06 बीजी […]

Continue Reading

निवृत्तीवेतन धारकांसाठी महत्त्वाची बातमी

मुंबई : निवृत्तीवेतनधारकांना त्यांचे वेतन वेळेवर मिळावे यासाठी डिजिटल डेटा व अभिलेखे यांची पडताळणी व अद्ययावतचे काम करण्यात येत असून निवृत्तीवेतनधारकांनी जन्मतारीख, ई मेल पत्ता, पॅन कार्ड डिटेल्स आदी माहिती पाठविण्याचे आवाहन अधिदान व लेखा कार्यालयाने केले होते. परंतू याच आशयाचे एक सही नसलेले पत्र व ई-मेल आयडीमुळे काही निवृत्तीवेतनधारकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असल्याचे निदर्शनास […]

Continue Reading
yes bank

येस बँक घोटाळाप्रकरणी मुंबईत छापे

मुंबई : राज्य सरकारने टाळेबंदी शिथिल केल्यानंतर तपास यंत्रणांनीदेखील जुन्या फाईलींवरची धूळ झटकून तपासाला गती दिली आहे. बँकिंग क्षेत्रात गाजलेल्या येस बँक घोटाळ्यात सक्तवसुली संचनालयाने आज सोमवारी मुंबईत बँकेच्या कर्जदारांवर छापे टाकले. दोन महिन्यांच्या लॉकडाउननंतर अचानक ‘ईडी’ने कारवाईचा धडाका लावल्याने येस बँक घोटाळ्यातील संशयितांमध्ये धडकी भरली आहे. दोन महिन्यांच्या दीर्घकालीन लॉकडाउनमधून मुंबईची काहीअंशी सुटका झाली असून […]

Continue Reading