ramesh karad

आ.रमेश कराडांकडून गोपीनाथ गडावर गर्दी; अडचणीत येण्याची शक्यता

परळी : पंकजाताई मुंडे यांचं तिकिट कापून विधान परिषदेवर सदस्य म्हणून नियुक्त झालेले आ.रमेश कराड यांनी आज गोपीनाथगडावर दाखल होत मोठी गर्दी केली. पाच किंवा त्यापेक्षा अधिक जणांना एकत्रित जमण्यास मज्जाव असताना, जिल्ह्यातील सगळी प्रार्थनास्थळे बंद असताना त्यांनी गोपीनाथ गडाचे दरवाजे उघडून आत कार्यकर्त्यांसह प्रवेश केला. यावेळी जिल्हाधिकार्‍यांनी घालून दिलेले सगळेच नियम आ.कराड यांनी धाब्यावर बसविल्याचे […]

Continue Reading

शिथीलतेचा ‘व्हायरस’ लॉकडाऊन वाढण्याला कारणीभूत

आधी 21 दिवस, नंतर 19 दिवस आणि पुन्हा 14 दिवसांचा कोरोनावास. त्यात पुन्हा मोबाईलवर वाजणारी कॉलरट्यून, आणि केंद्रापासून ते जिल्हाधिकारी पातळीपर्यंत दर अर्ध्या तासाला मिळणार्‍या मार्गदर्शक सुचना, नियमांमुळे लोक पागल व्हायची वेळ आली आहे. एकूण 54 दिवसांचा कोरोनावास आता संपत आला असतानाच पुन्हा बातम्या येत आहेत की अजून एखादा महिनातरी ‘कोरोनावास’ वाढण्याची शक्यता आहे. केंद्र […]

Continue Reading

केजचा भूमिपुत्र दिग्विजय देशमुख ‛आयपीएल’साठी मुंबई इंडियन्स संघात

केज : तालुक्यातील वरपगाव येथील भूमिपुत्र दिग्विजय राजकुमार देशमुखची इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) मुंबई इंडियन्स संघासाठी निवड झाली आहे. दिग्विजयचे वडील राजकुमार भागवत देशमुख हे 80 च्या दशकातील केज तालुक्यातील क्रिकेटमधील एक वेगवान गोलंदाज व अष्टपैलू खेळाडू म्हणून परिचित होते. राज्य रणजी किंवा देशाच्या क्रिकेट टीममध्ये खेळण्याचे स्वप्न होते. परंतु त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ शकले […]

Continue Reading

आंबेवडगाव कंटेनमेंट झोन घोषित

बीड : धारुर तालुक्यातील आंबेवडगाव येथे कोरोनाचा रुग्ण आढळल्याने गावात खळबळ उडाली होती. आता जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी गाव सील करण्याचे आदेश दिले आहेत. आंबेडवडगाव येथील रुग्णास मुंबई येथून आल्याचा प्रवासाचा इतिहास आहे. त्याच्यावर माजलगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. त्याचा गावातही प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संपर्क आल्याचा धोका लक्षात घेऊन आरोग्य विभागाच्या शिफारसीनुसार जिल्हाधिकार्‍यांनी गाव सील […]

Continue Reading
keij

कोयता,तलवारीने केजमध्ये दोन गटात तुंबळ हाणामारी

केज  : कोयता, तलवारीचा वापर करत केजमध्ये पारधी समाजाच्या दोन गटामध्ये तुंबळ हाणामारी झाली. यामध्ये काही जण जखमी झाले असून केज पोलीसात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पोलीस सुत्रांच्या माहितीनुसार, दि.4 जून रोजी केज येथील मुख्य रस्त्या लगत सायंकाळी 5 सुमारास पूर्वीचे जुने भांडण आपआपसात मिटविण्याच्या कारणावरून पारधी समाजाची बैठक बोलावली होती. त्यात हेव्यादाव्यावरून […]

Continue Reading
vadhu var

वधुपित्यांनो मुलींचं उरकण्याची घाई करा ! मोदी सरकार लग्नाचं वय वाढविण्याच्या विचारात !!

नवी दिल्ली : आपल्या मुलीचं लग्न यावर्षी उरकण्याच्या विचारात असाल तर आता वधुपित्यांना घाई करावी लागणार आहे. कारण लवकरच मोदी सरकार मुलीच्या लग्नाचं वय वाढविण्याची शक्यता आहे. सध्या  मुलीचं विवाहयोग्य वय 18 तर मुलांचं 21 वर्षे आहे. मोदी सरकारने जया जेटली यांच्या नेतृत्वात एका समितीची स्थापना केली आहे. याचे मुख्य कार्य स्त्रिया आणि त्यांच्या मुलाचे आरोग्याचा […]

Continue Reading
SRT HOSPITAL AMBAJOGAI

‘स्वाराती’त कोरोनाचा पहिला रूग्ण; आता प्रशासनावरील ताण वाढणार

अंबाजोगाई : येथील स्वाराती रूग्णालयात कोरोनाचा आज (दि.5) पहिला रूग्ण आढळला आहे. धारूर तालुक्यातील आंबेवडगावच्या 65 वर्षीय मुंबई रिटर्न व्यक्तीचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने स्वाराती प्रशासनातही आता खळबळ उडाली असून स्वाराती प्रशासनावरील ताण वाढणार आहे. अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठी विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. त्याठिकावरुन आतापर्यंत अनेकांचे स्वॅब पाठविण्यात आले. आज पहिल्यांदाच या […]

Continue Reading
gopinath munde devendra fadanvias

‘राज्याचे नेतृत्व फडणवीसांनी करावे ही गोपीनाथ मुंडेंची इच्छा होती’

बीड : स्व.गोपीनाथ मुंडे यांना राज्याचे नेतृत्व करण्याची इच्छा होती, परंतु मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळाले. त्यावेळी मी एका हेलिकॉप्टर प्रवासात राज्याचे नेतृत्व कोण करणार? असे विचारले होते, त्यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीसांकडे बोट दाखविले होते, असे विधान विधान परिषदेचे आमदार तथा भाजपचे मुख्य प्रतोद आ.सुजितसिंह ठाकूर यांनी दिली. वंजारी सेवा संघ महाराष्ट्र यांच्यावतीने लोकनेते गोपीनाथ […]

Continue Reading
pankja munde

शून्यापासून सुरु केलं, चांगलं जमेलं थोडे दिवसात

बीड ः विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपने माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांना डावलल्यानंतर सोशल मीडियावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात मुंडे समर्थक संताप व्यक्त करत आहेत. याबाबत पंकजाताई मुंडे यांनी मौन बाळगलेले असले तरी आज त्यांनी राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधणारे एक सूचक ट्वीट केलं आहे. पंकजाताई मुंडे यांनी दोन छायाचित्र पोस्ट करत ट्वीटमध्ये […]

Continue Reading