ACB TRAP

तहसीलदारास वाळूत लाच घेताना रंगेहाथ पकडले

पैठण: येथील राशन कार्ड घोटाळ्यातील सूत्रधार तथा पैठण येथील तत्कालीन तहसीलदार किशोर देशमुख यांनी वाळू माफियाकडून दीड लाख रुपयांचा लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. त्यामुळे महसूल खात्यात खळबळ उडाली आहे. पैठण येथील पंधरा हजार बोगस राशन कार्ड घोटाळ्यातील सूत्रधार व सध्या औरंगाबाद येथे अप्पर तहसीलदार म्हणून कार्यरत असलेले किशोर देशमुख यांनी वाळू माफिया कडून वाळूची […]

Continue Reading
anil deshmukh, parambir sing

बिग ब्रेकींग… गृहमंत्री देशमुख यांनी दर महिन्याला 100 कोटीची मागणी केली होती

मुंबई, दि. 20 : राज्याच्या राजकारणात प्रचंड खळबळ प्रकाराचा आज भांडाफोड झाला आहे. मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री आणि राज्यपालांना पत्र लिहून मोठा गौप्यस्फोट केला आहे. राज्याने गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दर महिन्याला माझ्याकडून 100 कोटी रुपयांची मागणी केली होती, असा आरोप त्या पत्रात केला आहे. पत्रातील मजकुरानुसार गृहमंत्री देशमुख यांनीच सचिन […]

Continue Reading
corona

आजही 265 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

बीड- जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आज तब्बल 265 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे सीईओ अजित कुंभार यांनी दिली. वाढत्या रुग्णसंख्येमुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. आज 1799 अहवाल प्रशासनाला प्राप्त झाले होते. त्यातील 1534 जण निगेटिव्ह असल्याचे आढळले. आज पॉझिटिव्ह आढळलेली रुग्णसंख्या खालील प्रमाणे….

Continue Reading
gelatin

विहीर खोदताना जिलेटीनचा स्फोट दोघांची प्रकृती चिंताजनक

धारूर, दि. 20 : तालुक्यातील धुनकवड येथे शेतातील विहीरीचे खोदकाम सुरू असताना सकाळी आठच्या सुमारास जिलेटिन कांड्याचा स्फोट करण्यात आला. या स्फोटाचा अंदाज न आल्याने येथे काम करण्यास उपस्थित असणार्‍यां पैकी चौघा जणांना दगड उडून मार लागला आहे. पैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने धारूर येथील ग्रामीण रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. नंतर वैद्यकिय अधिकारी […]

Continue Reading
sachin waze

का ठेवल्या जिलेटीन कांड्या? सचिन वाझेनं दिली कबुली?

मुंबई ः एकेकाळी मुंबईतील अंडरवर्ल्डचं कंबरंडं मोडणारे एन्काऊंटर फेम प्रदीप शर्मा, दया नायक यांच्याही पंक्तीत सचिन वाझे यांचं नाव होतं. परंतु त्या दोघांएवढी प्रसिध्दी वाझे यांना मिळाली नाही. त्यात पुन्हा 2004 मध्ये ख्वाजा युनूस प्रकरण घडलं. त्यात वाझे निलंबीत झाले. त्यामुळे पोलीस दलात अपेक्षीत अशी कामगिरी करताच आली नाही. राज्यात शिवसेनेचं सरकार सत्तेत आल्यावर सचिन […]

Continue Reading