कल्याणहून लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणारी बस उलटली; २० जखमी

बीड जिल्ह्यातील कडा गावाजवळ अपघात अहमदनगर: नगर-जामखेड रस्त्यावर सोमवारी लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या मिनी बसला अपघात झाला. यामध्ये कल्याण (मुंबई) येथील वीस जण जखमी झाले आहेत. बीड जिल्ह्यातील कडा गावाजवळ हा अपघात झाला. जखमींवर कडा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. जामखेड तालुक्यातील पिंपळगाव येथील विवाह समारंभासाठी कल्याण मिनी बसमधून ( एम.एच. ०५ – डी. […]

Continue Reading

पोलीस कर्मचार्‍याने परळीतील उड्डाणपूलावरुन मारली उडी!

परळी दि.18 : संभाजीनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलिस कर्मचार्‍याने परळीतील उड्डाणपूलावरुन उडी मारली. ही खळबळजनक घटना सोमवारी रात्री 8.15 वा.सुमारास घडली आहे. कर्मचार्‍याने उडी का मारली? याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. दरम्यान घटनास्थळी पोलीस अधिकारी, कर्मचारी पोहचले आहेत. हा कर्मचारी गंभीर जखमी असुन उपचारासाठी दाखल करण्यात येत आहे. सुनील घोळवे असे पोलीस […]

Continue Reading
popatrao pawar, bhaskarrao pere patil

ग्रामपंचायत निवडणूक : पोपटराव पवार अन् पेरे पाटलांच्या गावात काय झालं?

नगर, औरंगाबाद, दि. 18 : अहमदनगर जिल्ह्यातील आदर्श गाव म्हणून ख्याती असलेल्या हिवरे बाजारमध्ये तीस वर्षांनी ग्रामपंचायत निवडणूक झाली. या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे पोपटराव पवार यांनी विजय मिळवला आहे. पोपटराव पवार popatrao pawar यांच्या नेतृत्वाखालील आदर्श ग्राम विकास पॅनलचे उमेदवार पोपटराव पवार, विमल ठाणगे, विठ्ठल ठाणगे, मीना गुंजाळ, सुरेखा पादिर, रोहिदास पादिर, रंजना पवार हे सर्वजण […]

Continue Reading
RENU SHARMA AND DHANANJAY MUNDE

कथित रेणू शर्माचा आणखी एक कारनामा उघड; रिझवान कुरेशी नामक एअरवेज अधिकाऱ्यावरही आधी लगट, मग पोलिसात तक्रार

मुंबई – सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप केलेल्या रेणू शर्मा नामक महिलेवर भाजपचे माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी हनी ट्रॅप मध्ये अडकवल्याची तक्रार पोलिसात दिली आणि या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले. याच महिलेकडून असाच प्रयत्न मनसे नेते मनीष धुरी यांच्यासोबत देखील घडला असल्याचे उघड झाले; हे प्रकरण ताजे असतानाच आता रेणू शर्माचा […]

Continue Reading
dhananajay munde, renu sharma

धनंजय मुंडे ब्लॅकमेलिंग प्रकरण : मनसेच्या मनिष धुरींसोबतही असाच प्रकार घडला

मुंबई- मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करणार्‍या महिलेविरोधात एका भाजपा नेत्याने पोलीसात धाव घेतल्यानंतर आता आणखी एक प्रकरण पुढे आले आहे. कृष्णा हेगडे यांनीच याबाबत माहिती दिली. हेगडे यांच्या म्हणण्यानुसार मनसेचे मनिष धुरी यांनचाही मला फोन आला असून त्यांच्याही सोबत माझ्यासारखाच प्रकार घडला. त्यामुळे आता रेणू शर्मा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.धनंजय मुंडे यांच्या […]

Continue Reading
dhananjay-munde

नवा ट्विस्ट; धनंजय मुंडेंवर आरोप करणार्‍या महिलेविरोधात भाजपा नेता पोलीसात

मुंबई- मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करणार्‍या महिलेविरोधात एका भाजपा नेत्याने पोलीसात धाव घेतली आहे. संबंधीत महिला मला 2010 पासून ब्लॅकमेल करीत असल्याचा आरोप या नेत्याने केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणात नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. धनंजय मुंडे यांच्या आरोप करणारी महिला ही गायिका आहेत. त्यांच्या बहीण आणि धनंजय मुंडे हे दोघेही परस्पर […]

Continue Reading

धनंजय मुंडेंनी अत्याचार केल्याचा आरोप; मुंडेंकडून आरोपाचं खंडण

महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ बीड दि.12 : बीडचे पालकमंत्री तथा कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांनी बलात्कार केल्याचा आरोप करत नातेवाईक असलेल्या तरुणीने पोलिसांत धाव घेतली आहे. पोलिसांनी दखल न घेतल्याने तिने याबाबत मुंबई पोलीस आयुक्त, मुंबई पोलीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना ट्वीट करत तिने […]

Continue Reading

मुगगावमधील त्या कावळ्यांचा मृत्यू ‘बर्ड फ्लू’ने

 मुगगाव  दि.11 : पाटोदा तालुक्यातील मुगगाव येथे दोन दिवसापासून मोठ्या प्रमाणात कावळ्यांचा मृत्यू झाला होता. येथील कावळ्याचा मृत्यू ‘बर्ड फल्यू’ने झाला असल्याचा अहवाल प्राप्त झाल्याची माहिती जबाबदार अधिकार्‍यांनी कार्यारंभशी बोलताना नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे. त्यामुळे जिल्हाभरात खळबळ उडाली आहे. सध्याही मुगगाव परिसरातील पोल्ट्री फार्मवरील कोंबड्यांच्या रक्ताचे नमुने गोळा करण्याचे काम सुरु झाले आहे. […]

Continue Reading

मुगगावमध्ये कोंबड्यांच्या रक्ताचे नमुने घेतले

मुगगाव दि.11 : पाटोदा तालुक्यातील मुगगाव येथे दोन दिवसापासून मोठ्या प्रमाणात कावळ्यांचा मृत्यू झाला होता. येथील कावळ्याचा मृत्यू बर्ड फल्यू ने झाला की, अन्य कशाने ? यासाठी कावळ्यांचे शव भोपाळ येथील प्रयोग शाळेत पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल येणे अद्याप बाकी असले तरी आता पशुसंवर्धन विभागाकडून खबरदाराची उपाय म्हणून मुगगाव परिसरातील पोल्ट्री फार्मवरील कोंबड्यांच्या रक्ताचे […]

Continue Reading