suresh dhas

ऊसतोड कामगार, मुकादमांचा प्रश्न सुरेश धस यांच्या ‘फडात’

मागण्या मान्य केल्याशिवाय कारखान्याचा धुराडा पेटू देणार नाही -आ.सुरेश धस बीड, दि.26 : बीड जिल्ह्याचं संपूर्ण राजकारण आजपर्यंत ऊसतोड मजूर, मुकादमांच्या भोवती फिरलेले आहे. राज्यात आणि राज्याबाहेरील कारखान्यालाही मजुर पुरविण्याचे काम बीड जिल्ह्यातून होते. त्यामुळे सांगतानाच बीडची ओळख ऊसतोड मजुरांचा जिल्हा अशी केली जाते. आतापर्यंत या मजुरांचं नेतृत्व स्व.गोपीनाथ मुंडे यांनी केलं होतं. त्यांच्या पश्चात […]

Continue Reading

बीड जिल्हा : 51 पॉझिटिव्ह

बीड, दि.26 : बीड जिल्ह्यात आज पुन्हा 51 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आता 4204 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये अंबाजोगाई तालुक्यातील 2, परळी 10, बीड 9, माजलगाव 4, केज 9, आष्टी, धारूर प्रत्येकी 4, गेवराई 7 पाटोदा 2 अशी रुग्णसंख्या आहे. बीड कोरोना अपडेटएकूण रुग्ण- 4202 (आजचे धरून)कोरोना मुक्त […]

Continue Reading
tukaram mundhe

तुकाराम मुंढे यांची नागपुरहून बदली

मुंबई, दि.26 : वादाच्या केंद्रस्थानी असणारे नागपूर महानगर पालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची राज्य सरकारने बदली केली असून त्याच्या जागी बी. राधाकृष्णन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. स्थानिक पदाधिकारी आणि मुंढे यांच्यात महापालिकेत नेहमीच वाद उत्पन्न झालेले होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही केंद्रसरकारकडे मुंढे यांची तक्रार केली होती. सहा महिन्यांच्या आतच त्यांना नागपूर सोडण्याची […]

Continue Reading
imtiyaz jalil

1 तारखेपासून मंदिर उघडा; दोन तारखेपासून मशिदी – खा. इम्तियाज जलील

औरंगाबाद, दि.26 : एक तारखेला हिंदू बांधवांचा गणेश विसर्जनाचा दिवस आहे. त्या दिवशी राज्यातील सगळी मंदिरं उघडा. तर दोन तारखेपासून मस्जिदी उघडा. सरकारने आमची ही मागणी ऐकली नाही तर आम्ही स्वतःहून मस्जिदी उघडू, असा इशारा एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी दिला आहे. जलील म्हणाले, करोना संकटात लॉकडाउन मध्ये सर्व प्रार्थनास्थळं बंद आहेत. इतर गोष्टींवरील निर्बंध […]

Continue Reading
bandu jadhav parbhani

परभणीचे शिवसेना खासदार बंडू जाधव यांचा राजीनामा

स्थानिक पातळीवरील राष्ट्रवादीसोबतचा वाद चव्हाट्यावर परभणी, दि.26 : शिवसेनेचे परभणीचे खासदार संजय ऊर्फ बंडू जाधव यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आहे. जाधव यांनी कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून राजीनामा दिला असून राष्ट्रवादीकडून स्थानिक पातळीवर शिवसैनिकांची गळचेपी होत असल्याचा आरोप त्यांनी आपल्या पत्रात केला आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादीतील वाद चव्हाट्यावर आले आहेत.जाधव […]

Continue Reading
gharfodi, chori

धारूरमध्ये दुसऱ्या दिवशीही चोरी, शस्त्राने महिलेवर वार

किल्ले धारूर/ सचिन थोरात धारूर शहरात सलग दुसऱ्या दिवशी चोरीची घटना घडली आहे.येथील आझादनगर भाग असलेल्या परिसरात पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चोरीच्या उद्देशाने घरात घुसत धारदार शस्त्राने महिलेवर वार करत चोरी केल्याची घटना घडली आहे.महिलेस पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वराती येथे पाठवण्यात आले आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक सुरेखा धस करत आहेत. शहराच्या जवळच […]

Continue Reading