SOLAPUR NAVARDEO MORCHA

मुलगीच मिळेना… मुंडवळी बांधून भावी नवरदेवांचा कलेक्टर ऑफिसवर मोर्चा

सोलापूर दि.21 : वय उलटून गेले तरी लग्नासाठी मुलगीच मिळत नसल्याने सोलापूर येथील तरूणांनी चक्क कलेक्टर ऑफिसवर मोर्चा काढला. मोर्चेकरी चक्क फेटे बांधून मंडवळी बांधून, घोड्यावर स्वार झालेले होते. त्यांच्या हातात मुलगी देता का मुलगी म्हणून पाट्या होत्या. ज्योती क्रांती परिषदेच्या मध्यामातून काढलेल्या या मोर्चात शेकडो तरुण सहभागी झाले होते.आज सकाळी शेकडोंच्या संख्येने घोड्यावर बसलेले, […]

Continue Reading
RAMESH UBALE

32 वर्षापुर्वी घरातून निघून गेलेल्या चुलत्याला पुतण्यांनी आणले शोधून

– बीडच्या चर्‍हाटा CHARHATA येथील घटनाबीड, दि.14 : सोशल मीडियाचा जर चांगला वापर केला तर तो किती फायद्याचा ठरू शकतो याचं एक चांगलं उदाहारण बीड तालुक्यातील चर्‍हाटा गावच्या ग्रामस्थांना दिसून आलं आहे. त्याचं झालं असं की 32 वर्षापुर्वी कामाच्या शोधात घरातून निघून गेलेल्या चुलत्याला त्याच्या पुतण्यांनी सोशल मीडियावरील व्हिडिओने सुमारे दोन हजार किलोमीटरचा प्रवास करून […]

Continue Reading
tiktok star santosh munde

टिकटॉक स्टार संतोष मुंडेचा santosh munde करंट लागून मृत्यू

डीपीचे फ्यूज टाकताना अन्य एकाचाही मृत्यूप्रतिनिधी । धारूरदि.13 : धारूर तालुक्यातील भोगलवाडी येथील संतोष मुंडे tiktok star santosh mundeहा तरुण टिक टॉक स्टार म्हणून महाराष्ट्रात परिचित आहे. त्याचा आणि त्याच्यासह बाबुराव मुंडे याचा शेतातील विजेचा गेलेला फ्युज टाकत असताना करंट लागून त्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी रात्री सातच्या दरम्यान घडली. या घटनेमुळे सर्वत्र […]

Continue Reading
CHANDRAKANT PATIL

चंद्रकांत पाटलांवर CHANDRAKANT PATILपुण्यात शाईफेक

प्रतिनिधी । पुणेदि.10 : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील CHANDRAKANT PATIL यांच्यावर शाईफेक करण्यात आल्याची धक्कादायक घटना पुण्यातील पिंपरी भागात घडली आहे. चंद्रकांत पाटील यांनी काल भाषण करताना महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याविषयी बोलताना वादग्रस्त विधान केलं होतं. शिक्षणाचा प्रचार करण्यासाठी महापुरुषांनी भीक मागतल्याचं […]

Continue Reading
mobile chor, mobile chori

उत्तम दगडोबा गडम यांना माजलगावात मारहाण करून भरदिवसा लुटले

वैजेनाथ घायतिडक । माजलगाव दि.6 : माजलगावचे प्रसिध्द व्यापारी उत्तम दगडोबा गडम यांना भुलथाप मारून शहराच्या मध्यवस्तीतून गाडीवर बसवत नदीकिनारी घेऊन येत मारहाण करीत त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने लुटल्याची घटना माजलगाव शहरात सकाळी 10 च्या सुमारास घडली. या घटनेने प्रचंड खळबळ उडाली आहे. उत्तम दगडोबा गडम हे माजलगावातील कपडा व्यापारी आहेत. ते आज नेहमीप्रमाणे माजलगावच्या […]

Continue Reading
supreme courte

सत्तासंघर्षाची सुनावणी चार आठवडे लांबणीवर

मुंबई, दि.1 : ठाकरे गट आणि शिंदे गटातील वादामुळे महाराष्ट्रात निर्माण झालेल्या सत्तासंघर्षाची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणीला सुरुवात झाल्यानंतर घटनापीठाने दोन्ही पक्षकारांना लिखित स्वरुपात बाजू मांडण्याचे आदेश दिले. त्यासाठी घटनापीठाने तीन आठवड्यांची मुदत देऊ केली आहे. या मुदतीत ठाकरे गट आणि शिंदे गटाला न्यायालयात ही कागदपत्रे सादर […]

Continue Reading
nandurghat atmahatya

सोयाबीनच्या भिजलेल्या ढिगाकडे बघत शेतकर्‍याचा गळफास

अमोल जाधव/ नांदूरघाटपरतीच्या पावसाने काढणीला आलेलं आणि काढून ठेवलेल्या सोयाबीनचे नुकसान झाल्याने अल्पभुधारक शेतकर्‍याने आज लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना केज तालुक्यातील राजेगाव येथे 15 ऑक्टोबर रोजी सकाळी सहाच्या सुमारास घडली. संतोष अशोक दौंड (वय 40 रा. राजेगाव ता. केज) असे आत्महत्या केलेल्या शेतकर्‍याचे नाव आहे. संतोष यांना तीन मुली आणि […]

Continue Reading
nagpur-goa

समृध्दीच्या धर्तीवर नागपूर-गोवा महामार्ग, बीड जिल्हा जोडला जाणार

बीड, दि.8 : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर नागपूर-गोव्यादरम्यान 760 कि.मी. लांबीचा द्रुतगती महामार्ग बांधण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे या महामार्गाला बीड जिल्हा जोडल्या जाणार आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील 12 जिल्हे यातून जोडले जात आहेत. या महामार्गासाठी अंदाजे 75 हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित […]

Continue Reading
pankaja munde dasara melava

नाराज असल्याच्या चर्चा बंद करा, मी 2024 च्या तयारीला लागलेय – पंकजाताई मुंडे

सावरगाव घाट, दि.5 : मी नाराज असल्याच्या चर्चा मीडियाने थांबवाव्यात मी आता 2024 च्या तयारीला लागले आहे. मला आता कुठलंही पद नको, मी तुम्हाला काही देऊ शकत नाही, तरीही तुम्ही ऐवढ्या मोठ्या संख्येने इथे येता, असेच प्रत्येक दसर्‍याला येत राहा, असे आवाहन पंकजाताई मुंडे यांनी आपल्या समर्थकांना केले. त्या सावरगाव घाट येथे दसरा मेळाव्यात बोलत […]

Continue Reading

माजलगाव धरणात बुडालेल्या डॉ.फपाळ यांचा मृतदेह सापडला

गणेश मारगुडे । खानापूर (माजलगाव) दि.19 : रविवारी सकाळी माजलगाव धरणावर पोहण्यास गेलेले तेलगाव येथील डॉ. दत्तात्रय श्रीमंतराव फपाळ यांचा मृतदेह सायंकाळी पाचच्या सुमारास हाती लागला आहे. येथील मच्छिमारांनी गळ टाकून त्यांचा शोध घेतला असता त्यात त्यांचा मृतदेह हाती लागला. माजलगाव तालुक्यातील बेलोरा येथील दत्तात्रय श्रीमंत फपाळ (वय 45) यांचे तेलगाव येथे अजिंक्य हॉस्पिटल आहे. […]

Continue Reading