SIDHESHWAR VIDYALAY MAJALGAON

सिद्धेश्वर विद्यालयाच्या कर्मचार्‍यांना प्रवेश फीसच्या नावाखाली लूट करताना पकडले!

आ.सोळंके, शिक्षणाधिकारी, पोलीसांचे स्टिंग;1 लाख 76 हजाराची रोकड जप्तमाजलगाव दि.14 : शहरात विद्यार्थ्यांची अडवणूक करत फिसच्या नावाखाली लूट करत असल्याची ओरड सिद्धेश्वर विद्यालयात नेहमीच होते. मंगळवारी (दि.14) तीन कर्मचार्‍यांना विद्यार्थ्यांच्या पालकांकडून लूट करत असल्याचा प्रकार उघड झाला. येथील वैष्णवी मंगल कार्यालयात सुरू असलेल्या या कारस्थानावेळी स्वतः आमदार प्रकाश सोळंके यांनी शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी, पोलीसांसह जाग्यावर […]

Continue Reading

नंदकुमार ठाकूर बीडचे नवे एसपी!

बीड दि.8 ः नांदेड येथील नागरी हक्क संरक्षण विभागाचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांची बीडचे पोलीस अधीक्षक म्हणून बुधवारी (दि.8) नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची नियुक्ती गृहविभागाच्या आदेशाने करण्यात आली आहे. जिल्ह्यातील गुन्हेगारी रोखण्याचे त्यांच्यासमोर आव्हान असणार आहे. पोलीस अधीक्षक आर.राजा यांच्या बदलीनंतर प्रभारी पोलीस अधीक्षक म्हणून पंकज देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली होती. महिन्यापेक्षा […]

Continue Reading

गर्भपात प्रकरणातील सीमा सिस्टरची आत्महत्या!

बीड दि. 8 : गर्भपात प्रकरणात पिंपळनेर पोलीस ठाण्यात बुधवारी पहाटे गुन्हा दाखल झाला, यातील पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर यातील आरोपी सीमा सिस्टरने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. सीमा सुरेश डोंगरे (वय 45 रा.शिक्षक कॉलनी बीड) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. तिचा मृतदेह बुधवारी सकाळी बिंदुसरा धरणामध्ये मृतावस्थेत आढळून आला. बीड […]

Continue Reading

अवैध गर्भपात प्रकरणात पाच जणांवर गुन्हा दाखल!

तपासात आरोपींची संख्या वाढणार बीड दि.8 ः गर्भपातादरम्यान रक्तस्त्राव होऊन महिलेचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि.5) घडली होती. त्यानंतर मयत महिलेच्या पतीसह नातेवाईकांना चौकशीसाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलावले. त्यांनी कबुली देताच त्यांना ताब्यात घेतले, तसेच गेवराई तालुक्यातील अंगणवाडी सेविकेसह सिस्टरला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या प्रकरणी बुधवारी (दि.8) पहाटेच्या सुमारास पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल […]

Continue Reading
death

तरुणाचा संशयास्पद मृत्यू; मृतदेहाशेजारी आढळले पिस्टल!

बीड दि.8 ः शहरातील स्वराज्यनगर परिसरामध्ये एका तरुणाचा बुधवारी (दि.8) सकाळी मृतदेह आढळून आला. तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. दरम्यान मृतदेहाच्या शेजारीच एक पिस्टल आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. अक्षय भांडवले (वय 38 रा.बार्शी नाका, बीड) असे मयताचे नाव आहे. त्याचा मृतदेह स्वराज्यनगर येथील मारुती-सुझूकी शोरुमच्या जवळ […]

Continue Reading

लाचखोर विस्तार अधिकारी एसीबीच्या जाळ्यात!

माजलगाव दि.6 : सेवाजेष्ठता यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी प्रस्ताव तयार करून तो जिल्हा परिषद बीड येथे पाठवून केलेल्या कामाचा मोबदला म्हणून तक्रारदाराकडे 10 हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडअंती 5 हजार रुपयांची लाच स्वीकारताना माजलगाव पंचायत समिती समोर सोमवारी (दि.6) दुपारी रंगेहात पकडले. रामचंद्र होनाजी रोटेवाड ( वय 30, विस्तार अधिकारी, ( ग्रामपंचायत विभाग), पंचायत […]

Continue Reading

पतीने केला पत्नीचा खून; रचला दरोड्याचा बनाव!

बीड दि. 5 : महिलेचा स्क्रूड्रायवरच्या सहायाने गळा दाबून हत्या केल्याची घटना बीड तालुक्यातील रंजेगाव येथे रविवारी (दि. 5) पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. दरोडेखोरांनी हा प्रकार केल्याचे बनाव मयत महिलेच्या पतीने रचला होता. मात्र सगळा प्रकार संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच महिलेच्या पतीने आपणच हे कृत्य केल्याची कबुली पोलिसांना दिली. ज्योती दिनेश आबुज (वय […]

Continue Reading
fire

तालखेडमध्ये दारुड्याचा गोळीबार!

ऊसतोड मजूर जखमी; संतापलेल्या ग्रामस्थांनी दारुड्यास दिला जबर चोपतालखेड दि.30 ः कारखान्याहून परतलेल्या ऊसतोड मजुरांचा हलगीच्या तालावर जल्लोष सुरु होता, यावेळी पाठीमागून गाडीत आलेल्या दारुड्यांनी हार्न वाजवला. त्यांना रस्ता न मिळाल्यामुळे यातील एका दारुड्याने गोळीबार केला. यामध्ये एक ऊसतोड मजूर जखमी झाला असून त्यास उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान ग्रामस्थांनी संतप्त होत […]

Continue Reading

टेम्पोखाली चिरडून चिमुकलीचा मृत्यू!

पुरुषोत्तमपुरी येथील घटनामाजलगाव दि.30 ः गॅस टाक्याने भरलेला टेम्पो पाठीमागे घेताना टायरखाली आल्याने दीड वर्षीय चिमुकलीचा चिरडून जागीच मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना पुरुषोत्तम पुरी येथे सोमवारी (दि.30) दुपारच्या सुमारास घडली. योगायोग गॅस एजन्सी माजलगाव येथून गॅस टाक्या घरपोच करणारा टेम्पो पुरुषोत्तम पुरी येथे आला होता. त्या टेम्पोतून गॅस टाक्या खाली केल्यानंतर टेम्पो पाठीमागे घेत […]

Continue Reading
areested

म्हाडा पेपर फुटी प्रकरणामध्ये बीडच्या महिला एजंटला अटक!

परीक्षार्थींना गोळा करण्याचे करायचे कामबीड दि.23 : म्हाडापरीक्षेचा पेपर फुटीप्रकरणी सायबर पोलिसांनी एका महिला एजंटला बीड येथून अटक केली आहे. परीक्षार्थींना गोळा करण्याचे काम ही महिला एजंट करीत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. आतापर्यंत म्हाडा पेपरफुटी प्रकरणातील ही अकरावी अटक आहे. कांचन श्रीमंत साळवे (वय 31, रा. नागसेन नगर, धानोरा रोड, बीड) असे या […]

Continue Reading