DAGDANE MARHAN

पाटोदा आगाराच्या बसवर दगडफेक!

जामखेड-बीड रोडवरील मोहा परिसरातील घटनापाटोदा दि.25 ः मागील काही महिन्यांपासून एस.टी.कर्मचार्‍यांच्या संपावर अद्याप तोडगा निघाला नाही. मात्र एस.टी बसवरील हल्ले थांबायला तयार नाहीत. याबाबत जामखेड सौताडा रोडवरील मोहा शिवारात पाटोदा अगाराच्या बसवर रात्री साडेसातच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी दगडफेक केल्याची घटना समोर आली. या प्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला. एसटी कर्मचार्‍यांचा संप […]

Continue Reading

बायपासच्या पंख्यासाठीचा मुरुम टाकला खाजगी बांधकामावर!

पासचा गैरवापर केल्यामुळे बीड तहसीलदारांची टिप्परवर कारवाईबीड दि.13 : येथील बायपास टू बायपास या रस्त्यावरील साईड पंखे मुरुमाने भरण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. मात्र या परवानगीचा गैरवापर करत साईड पंखे भरण्याचे सोडून एका टिप्पर चालकाने खाजगी बांधकामावर मुरुम टाकल्याचे दिसून आले. या प्रकरणी बीड तहसीलदार सुरेंद्र डोके यांनी सदरील टिप्परवर कारवाई करत टिप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात […]

Continue Reading
arrested criminal corona positive

चार बालकांच्या मृत्यू प्रकरणी एका वाळू माफियास अटक!

गेवराई दि.13 : तालुक्यातील शहाजानपुर चकला येथे वाळू माफियांनी खोदलेल्या खड्ड्यामध्ये बुडून चार चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी गेवराई पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध नदीपात्रात अवैध वाळू उपसा केल्याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील एका आरोपीच्या शनिवारी (दि.12) रात्री पाचोड परिसरातून गेवराई पोलीसांनी मुसक्या आवळल्या आहेत. गेवराई तालुक्यातील शहाजानपूर […]

Continue Reading

म्हाडा परीक्षेत डमी उमेदवार बसवणारा आरोपी बीड पोलिसांच्या ताब्यात!

बीड – पेपर फुटी, डमी उमेदवार या बाबतीत बीडचे नाव कमी व्हायला तयार नाही. आज (दि.11) बीडमध्ये अभिषेक भारत सावंत रा. आहेर चिंचोली(हमु शाहू नगर पाण्याच्या टाकीजवळ) यास शिवाजीनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नागपूर एमआयडीसी पोलिस ठाण्यात 9 फेब्रुवारी रोजी गुन्हा नोंद झाला होता. अभिषेक भारतराव सावंत ( वय 28 ह.मु शाहूनगर बीड, […]

Continue Reading
fire

फोटो स्टंट पडला महागात; गोळी लागून युवकाचा मृत्यू

नगर दि.31 सोशल मीडियावर फोटो व्हायरल करण्यासाठी तरुण वेगवेगळे स्टंट करतात. असाच एक स्टंट एका युवकाच्या जीवावर बेतला आहे. तोंडामध्ये गावठी पिस्तुल घालून व्हिडीओ तयार करताना अचानक पिस्तुलचे बटन दबल्याने गोळी लागून युवकाचा मृत्यू झाला. ही घटना अहमदनगर जिल्ह्यातील गुंजाळे गावात घडली. प्रदिप एकनाथ पागिरे (रा.गुंजाळे ता.राहुरी जि.अहमदनगर) असे मयत युवकाचे नाव आहे. प्रदिप हा […]

Continue Reading

जाटनांदूरच्या तरुणाचा सोलापुरात खून!

जाटनांदूर दि.29 : शिरुर तालुक्यातील जाटनांदूर येथील तरुणाचा सोलापूर जिल्ह्यातील विटोपीन कारखान्यावर खून केल्याची घटना शुक्रवारी (दि.28) उघडकीस आली. आकाश सोमीनाथ वाल्हेकर (वय २३) असे तरुणाचे नाव आहे. आकाश हा जामखेड येथे नर्सिंग कोर्स करत होता. त्याचे आई-वडील सोलापूर जिल्ह्यातील विटोपीन कारखान्याला ऊसतोडणीसाठी गेले होते. पंरतु काही कोयते गावाकडे पळून आल्यामुळे तो महीन्यापूर्वी कारखान्यावर ऊसतोडायला […]

Continue Reading
corona virus

कोरोना बाधितांचा आकडा तिनशेपार!

बीड दि.22 ः राज्यात कोरोना बाधितांचा आकडा कमी होत असताना बीड जिल्ह्यात मात्र बाधितांचा आकडा वाढत आहे. हळूहळू हा आकडा वाढतच आहे. शनिवारी (दि.22) जिल्ह्यात 307 कोरोना बाधित आढळून आले. त्यामुळे नागरिकांनी मास्क, सोशल डिस्टन्सिंगसह नियमाचे पालन करणे गरजेचे आहे. बीड जिल्ह्यात शनिवारी (दि.22) प्राप्त झालेल्या अहवालात तब्बल 2 हजार 414 रुग्णांची तपासणी केली असता […]

Continue Reading

वृद्ध महिलेचा दगडाने ठेचून खून!

घटनास्थळी पंकज कुमावतांची धाव नांदूरघाट दि.22 ः दगडाने ठेचून एका 60 वर्षीय वृद्ध महिलेचा खून करण्यात आला. ही घटना केज तालुक्यातील नांदूरघाट जवळील हंगेवाडी येथे शनिवारी (दि.22) सकाळी घडली. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच श्वान पथकासही पाचारण करण्यात आले होते. या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील […]

Continue Reading

17 चंदन तस्करांसह नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त!

सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांची कारवाईगेवराई दि.21 : चंदनाची झाडे तोडून त्याची तस्करी करणार्‍यांनी गेवराई तालुक्यात साठा करुन ठेवल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी मिळाली. त्यांच्या पथकाने शुक्रवारी (दि.21) गेवराई तालुक्यातील उक्कड पिंपरी येथील शेतात छापा मारला असता यावेळी 17 चंदनतस्कर आढळून आले. त्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून 7 लाख 87 हजाराचे चंदन, […]

Continue Reading
ACB TRAP

लाचखोर वाहन निरिक्षकासह एजंट एसीबीच्या जाळ्यात!

बीड एसीबीची कारवाईबीड दि.20 : वाहनांची तपासणी करून योग्यता प्रमाणपत्र देण्यासाठी दोन हजार रुपयाची लाचेची मागणी करणाऱ्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील वाहन निरीक्षक व एका खाजगी एजंटवर बीड एसीबीने गुरुवारी (दि.20) कारवाई केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरटीओ कार्यालयात झालेल्या कारवाईने खळबळ उडाली आहे. आरटीओ कार्यालयात मोठ्या प्रमाणात वसुली होत […]

Continue Reading