आयपीएस पंकज कुमावत यांचा गुटखा माफियांना दणका!

बीड तालुक्यातील इमामपूर परिसरात गुटखा पकडला बीड दि.16 : बीड जिल्ह्यात सर्रासपणे गुटख्याची विक्री केली जात असल्याचे आयपीएस प्रशिक्षणार्थी उपअधीक्षक पंकज कुमावत यांच्या कारवायावरुन समोर येत आहे. पंकज कुमावत यांनी केज उपविभागाचा पदभार स्विकारताच गुटखा माफियांकडे आपला मोर्चा वळवला. आतापर्यंत त्यांनी गुटख्याच्या कारवाया करत कोट्यावधींचा मुद्देमाल जप्त केला आहे. मंगळवारी (दि.16) बीड तालुक्यातील इमामपूर परिसरातील […]

Continue Reading

अंबाजोगाईत 15 लाखांचा गुटखा पकडला!

अंबाजोगाई दि.7 : मागील काही महिन्यांपासून नव्याने केज उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून आलेल्या परिविक्षाधीन पोलीस अधिकारी पंकज कुमावत यांनी अवैध धंद्यांवर कारवाईचा धडका सुरु केला आहे. नुकताच मांजरसुंबा परिसरात दोन ट्रक गुटखा पकडला होता, त्याचबरोबर इतरही गुटख्याच्या कारवाया केल्या आहेत. शनिवारी (दि.6) रात्री अंबाजोगाई शहरामध्ये 15 लाख 23 हजाराचा गुटखा पकडला. त्यांच्या या कारवाईने गुटखा […]

Continue Reading

शस्त्राचा धाक दाखवून सिरसाळ्यात दरोडा!

नगदी 92 हजारांसह सोन्या, चांदीचे दागिने लुटले सिरसाळा दि.7 : चार दरोडेखोरांनी तलवारी सारख्या शस्त्रांचा धाक दाखवत नगदी रक्कम व सोन्या चांदीचे दागिणे लुटल्याची घटना परळी तालुक्यातील सिरसाळा येथे रविवारी (दि.7) पहाटेच्या सुमारास घडली. यावेळी चोरट्यांनी नगदी 9 हजार 200, सोन्या चांदीची दागिणे असा लाखोंचा ऐवज लंपास केला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडली. घटनास्थळी […]

Continue Reading

परळीतून 140 गाढवे चोरी!

परळी दि.30 : दुचाकी, मोबाईल सह इतर चोरीच्या घटना आपण पाहिल्या आहेत. मात्र परळी शहरातून चक्क 140 गाढवे चोरी गेले आहेत. यामुळे शहरात खळबळ उडाली असून या प्रकरणी संभाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. परळी शहरात वीटभट्टीसह इतर कामांसाठी भोई, बेलदार व वडार यांच्याकडे गाढवे आहेत. मात्र मागील पंधरादिवसांपासून एक एक करत तब्बल […]

Continue Reading

फडातून ऊस घेवून जाणार्‍या ट्रॅक्टरने मजुराची मुलगी चिरडली!

बीड दि.30 : ऊसाचा ट्रॅक्टर भरल्यानंतर फडातून बाहेर काढताना ट्रॅक्टरखाली चिरडून एका चिमुकलीचा मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यात घडली आहे. सदरील मजुर हे वडवणी तालुक्यातील आहेत. या मजुरांवर कारखानदारांकडून या पीडित कुटूबीयांनाच दडपशाही केली जात आहे. दसरा झाल्यानंतर बीड जिल्ह्यातून ऊसतोड मजूर राज्यातील विविध जिल्ह्यांसाह परप्रांतात ऊसतोडणीसाठी जातात. आतापार्यंत तब्बल चार लाखांच्या […]

Continue Reading

परळी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर गांजाची शेती!

दोन आरोपी ताब्यातबीड दि.29 : परळी तालुक्यातील हाळंब येथील परिसरात विविध ठिकाणी शेतात गांजाची लागवड केलेली शुक्रवारी (दि.29) पहाटे आढळून आली आहे. परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मारोती मुंडे व त्यांची टीमने कारवाई केली असून मोठ्या प्रमाणात गांजा जप्त करण्यात आला आहे. तसेच दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चक्क पालकमंत्र्यांच्या तालुक्यात गांजाची […]

Continue Reading

बीडमध्ये बनावट दारूच्या गोदामावर छापा; कोटींचा मुद्देमाल जप्त

बीड दि.28 : बनावट दारू तयार करणाऱ्या गोदामावर राज्य उत्पादन शुल्क विभाग व बीड ग्रामीण पोलिसांनी गुरुवारी (दि.28) सकाळी छापा मारला. या छाप्यात कोट्यावधी रुपयांची बनावट दारुसह मशनरी जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईने खळबळ उडाली आहे. बीड शहरालगत असलेल्या गोदामांमध्ये देशी दारू बनवली जात होती. याची माहिती राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक नितीन घुले व […]

Continue Reading
r raja

ठाणेप्रमुखांच्या बदल्या!

बीड दि.27 ः बीड जिल्हा पोलीस दलातील ठाणेप्रमुखांची बुधवारी (दि.27) खांदेपालट करण्यात आली. यामुळे काहींना दुखःद तर काहीन सुखद धक्का बसला आहे. पोलीस अधीक्षक आर.राजा यांनी परळी शहरचे पोनि.हेमंत कदम, माजलगाव ग्रामीणचे पोनि.संतोष पाटील, पेठबीड ठाण्याचे पोनि.विश्वास पाटील यांची नियंत्रणक कक्षात तर नियंत्रण कक्षातील पोनि.उमाशंकर कस्तुरे यांची परळी शहर ठाणे, पोनि.प्रकाश मुंडे यांची माजलगाव ग्रामीण […]

Continue Reading

भ्रष्टाचार विरोधी सप्ताहाचा गेवराईत प्रारंभ; लाचखोर एसीबीच्या जाळ्यात

गेवराई दि.26 : तपासणी अहवाल चांगला पाठवण्यासाठी आगार प्रमुखाने कर्मचार्‍याकडे लाचेची मागणी केली. सदरील लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (दि.26) दुपारी रंगेहाथ पकडले. ही कारवाई औरंगाबादच्या एसीबीने केली. भ्रष्टाचार विरोधी सप्ताहाच्या प्रारंभदिनी ही कारवाई करण्यात आली आहे. श्रीनिवास के. वाघदरिकर हे गेवराई आगारप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. येथील कार्यालयाची बीड विभागाकडून तपासणी करण्यात आली होती. […]

Continue Reading