पोलीस पत्नीकडून पोलीस पतीला न्यायालयाच्या आवारात मारहाण!

पत्नीवर शिवाजीनगर पोलीसात 353 चा गुन्हाबीड दि.7 : न्यायालयाच्या आवारामध्ये पोलीस पत्नीने ड्युटीवर असलेल्या पोलीस पतीला मारहाण केली. या प्रकरणी शासकिय कामात अडथळा आणल्याप्रकरणी पत्नीवरच शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार गुरुवारी (दि.7) सकाळी न्यायालयाच्या आवारात घडला. सद्दाम सत्तार शेख (वय 30) हे पिंपळनेर पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहेत. तर […]

Continue Reading

‘त्या’ घटनेत आत्याचा मुलगाच निघाला खूनी!

बीड दि.7 : राष्ट्रीय महामार्गालगत असणार्‍या रांजणीजवळ मागील आठवड्यात एक मानवी सांगडा आढळून आला होता. गेवराई पोलिसांनी डॉक्टरांच्या मदतीने तो सांगडा महिलेचा असल्याचे स्पष्ट केल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी आढळून आलेल्या वस्तूंवर त्या महिलेची ओळख देखील पटवली होती. पोलीस तपासामध्ये ‘त्या’ महिलेचा तिचा आत्याच्या मुलानेच पैशासाठी खून केल्याचे समोर आले आहे. तसेच पुरावा नष्ट करण्याचाही प्रयत्न केलेला […]

Continue Reading
ajit pawar

अजित पवारांच्या निकटवर्तीयांना झटका!

साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यावर आयकर विभागाचे छापे बीड दि.7 : साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यावर प्राप्तिकर विभागाने छापा टाकला आहे. जरंडेश्वर साखर कारखाना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात आहे. विशेष म्हणजे भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी बुधवारीच जरंडेश्वर कारखान्याला भेट दिली होती. त्यानंतर लगेचच ही कारवाई करण्यात आली आहे. सीआरपीएफच्या जवानांची मदततीने ही कारवाई करण्यात […]

Continue Reading
ACB TRAP

लाचखोर तलाठी एसीबीच्या जाळ्यात !

आष्टी दि.6 : सातबारावर वारसाची नोंद करण्यासाठी 3 हजार रुपयांची लाच घेताना आष्टी तालुक्यातील पिंपळा येथील तलाठ्यास बीड एसीबीने बुधवारी (दि.6) रंगेहाथ पकडले. एसीबीचा पदभार घेतल्यानंतर उपअधीक्षक भारत राऊत यांच्या नेतृत्वात ही पहिलीच कारवाई झाली असून राऊत यांनी कारवाईचे खाते उघडले आहे. आष्टी तालुक्यातील पिंपळा येथील सजाचा तलाठी जालिंदर गोपाळ नरसाळे (वय 49) हा सातबारावर […]

Continue Reading

घाटनांदूर परिसरातील नुकसानीच्या पाहणीसाठी पथक शेतकर्‍यांच्या बांधावर

कार्यारंभ इम्पॅक्ट : जि.प.अध्यक्षपतींसह तहसिलदार पाटील यांनी केली पाहणीघाटनांदूर दि.30 : अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर परिसरातील पीक पाहणी करण्यासाठी कुठलाच लोकप्रतिनिधी प्रतिसाद देत नसल्याने परिसरातील शेतकर्‍यांत नाराजीचा सूर उमटत होता. या संदर्भात दैनिक कार्यारंभमध्ये ‘घाटनांदूर येथील नुकसानग्रस्त भागाकडे लोकप्रतिनिधींचे दूर्लक्ष’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. या वृत्ताची दखल घेत गुरुवारी (दि.30) लोकप्रतिनिधींसह प्रशासनाचा ताफा […]

Continue Reading

‘त्या‘ आ.संदीप क्षीरसागर यांची गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता

बीड दि.29 : बीडचे विद्यमान आमदार संदिप क्षीरसागर यांच्यावर अभियांत्रिकेचे शिक्षण घेत असताना 2001 साली उत्तरपत्रिका बदलल्याबाबत दाखल गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यातून आ.क्षीरसागर यांची अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी पी.आर. शिंदे यांनी सबळ पुराव्यांअभावी बुधवारी निर्दोष मुक्तता केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे तत्कालीन परीक्षा नियंत्रक डॉ.माधव गुमास्ते यांनी 25 सप्टेंबर 2001 रोजी छावणी पोलीस ठाण्यात […]

Continue Reading

गुढ आवाजाने आवरगाव हादरले!

ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण धारूर दि.29 : धारुर शहरापासून चार किमी अंतरावर असणार्‍या आवरगाव येथे अचानक दहा वाजता जमिनीतून गुढ आवाज झाल्याने पूर्ण गाव हादरले आहे. पत्राची घरे आणि जूने मातीकाम असणार्‍या घरांच्या भिंतीला मोठ्याप्रमाणावर हादरे बसले आहेत. पूर्ण गावकरी एकत्र गावाच्या बाहेर रस्त्यावर जमा झाले असून प्रशासनास या घटनेची माहिती देण्यात आली आहे. धारुर तालुक्यातील […]

Continue Reading

आपेगावमध्ये बचाव कार्यासाठी एनडीआरएफची तुकडी दाखल

18 जणांना सुखरूप बाहेर काढले अंबाजोगाई दि.28 : तालुक्यात आपेगाव येथे मांजरा धरणाचे पाणी शिरल्याने अर्धे गाव पाण्यात सापडले होते, या गावात आज एनडीआरएफची तुकडी दाखल झाली. आतापर्यंत सकल भागात अडकून पडलेल्या तब्बल 18 जणांना सहीसलामत बाहेर काढल्याने गावकरी वर्गाने सुटकेचा निश्वास टाकला आहे. एनडीआरएफचे पथक आपेगावमध्ये दाखल झाल्याने बचाव कार्याला वेग आला आहे. एनडीआरएफच्या […]

Continue Reading
pur

जिल्हाभरात आभाळ फाटलं!

बीड दि.28 : मागील चार दिवसापासून सुरु असलेल्या पावसाने, त्यात सोमवारी रात्री मुसळधार पावसामुळे जिल्हाभरात आभाळ फाटल्या सारखं दिसत आहे. बीड, गेवराई, अंबाजोगाई, माजलगाव, धारुर, वडवणी, आष्टी, पाटोदा, शिरुर, केज, परळी या तालुक्यात धुवाँधार पावसामुळे शेतकर्‍यांचे आतोनात नुकसान झाले असून अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे. पुलावरुन पाणी वाहत असल्यास त्यावरुन जाऊ नये असे अवाहन जिल्हा […]

Continue Reading

ओढ्याच्या पुरात दुचाकीसह दोघे वाहून गेले!

धारूर दि.27 : तालुक्यात दोन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहेत. अनेक ठिकाणच्या गावचा संपर्क तुटलेला आहे. यात रविवारी रात्री चिंचपूर येथील पुलावरून पाण्याचा अंदाज न आल्याने दोन तरुण दुचाकीसह वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली. धारूर आडस रस्त्या दरम्यान आवरगाव आणि पांगरी या ठिकाणी फुलावर पाणी आले होते. तसेच चोरांबा, पाडीपारगाव, […]

Continue Reading