arrested criminal corona positive

सोनार खून प्रकरणातील मुख्य आरोपी एलसीबीने केला नाशिकातून जेरबंद!

शिरुर : येथील सराफा व्यावसायीक विशाल कुल्थे यांच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपीस मंगळवारी (दि.1) पहाटे नाशिक येथून ताब्यात घेतले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि.भारत राऊत यांनी केली. यामध्ये त्यांना नाशिक पोलिसांनी मोठी मदत केली. शिरुर येथील विशाल कुल्थे या सराफा व्यापार्‍याचे अपहरण करुन त्याचा खून केल्याची घटना घडली होती. या प्रकरणातील मास्टर माईंड ज्ञानेश्‍वर […]

Continue Reading
suicide

सॅनिटायझर प्राशन करुन विवाहितेने केली आत्महत्या!

कोरोना असल्याचा बनवला बोगस पॉझिटिव्हरिपोर्ट, सतर्कतेमुळे घटनेचा झाला भांडाफोडपाटोदा दि.27 : कार घेण्यासाठी माहेरून अडीच लाख रुपये घेऊन येण्यासाठी सासरच्यांनी विवाहितेचा अतोनात छळ केला. सततच्या छळाला त्रासलेल्या विवाहितेने सॅनिटायजर प्राशन करून आत्महत्या केली. मात्र, विवाहितेने विषारी द्रव प्राशन केल्याचे उघड होऊ नये यासाठी शवविच्छेदन टाळण्यासाठी सासरच्यांनी चक्क तिचा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा बोगस रिपोर्ट बनवला. परंतु, […]

Continue Reading
atyachar

कोविड सेंटरमधील नर्सचा सोबत काम करणार्‍या ब्रदरकडून विनयभंग

अंबाजोगाई दि.27 ः सोबत काम करणार्‍या ब्रदरनेच दीड महिन्यापासून सतत पाठलाग करून नर्सला त्रास दिला. त्यानंतर मंगळवारी (दि.25) रात्री घरात घुसून तिचा विनयभंग केला. हा प्रकार लोखंडी सावरगाव येथील कोविड सेंटरमध्ये घडला आहे. या प्रकरणी ब्रदरवर अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा नोंदविण्यात आला. पीडीत नर्सने दिलेल्या फिर्यादीनुसार, मागील दिड महिन्यापासून त्या राहत असलेल्या रूमचा रात्री […]

Continue Reading
corona

आजचा आकडा अत्यंत दिलासादायक!

बीड दि.27 : मागील चार दिवसापासून कोरोना बाधितांचा आकडा हळूहळू कमी होत आहे. 1 हजार 500 च्या पुढे गेलेला बाधितांचा आकडा आता हजाराच्या आत येत आहे. गुरुवारी (दि.27) कोरोना बाधितांचा आकडा अत्यंत दिलासादायक आला आहे. जिल्ह्यात 603 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये बीड तालुका सर्वात आघाडीवर आहे. आरोग्य विभागाला गुरुवारी (दि.27) पाच हजार 588 […]

Continue Reading

परळीतील नामांकीत कपड्याने दुकान सील!

परळी दि.26 : कोरोनाच्या वाढत्या प्र्रादुर्भावामुळे जिल्ह्यात सध्या कडक लॉकडाऊन सुरू आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच आस्थापना बंद करण्यात आल्या आहेत. मात्र परळी शहरात छुप्या पद्धतीने दुकानदार आपली दुकाने सुरूच ठेवत आहेत. शटर खाली ओढून दुकानात गर्दी करतांना दिसून येत आहेत. बुधवारी सामंत कपड्याचे दुकान उघडे असल्यामुळे सील करण्यात आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बीड […]

Continue Reading
corona virus

आजचा आकडा अत्यंत दिलासादायक!

बीड दि.27 : दोन दिवसापूर्वी कोरोना बाधितांचा आकडा वाढला होता. मात्र मागील महिनाभराच्या तुलनेत बुधवारी (दि.26) कोरोना बाधितांचा आकडा अत्यंत दिलासादायक आला आहे. जिल्ह्यात 703 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये बीड तालुका सर्वात आघाडीवर आहे. आरोग्य विभागाला बुधवारी (दि.26) पाच हजार 501 संशयीतांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये 703 जण बाधित आढळून आले. तर 4 […]

Continue Reading
MURDER

आईला शिवीगाळ, मुलाने कोयत्याने तोडला बाप!

बीड दि.25 : दारु पिऊन आईला शिवीगाळ करणार्‍या बापाची कोयत्याने सपासप वार करत मुलाने खून केला. ही खळबळजनक घटना बीड तालुक्यातील पिंपळनेर परिसरात शेतात मंगळवारी (दि.25) सकाळी घडली. पोलीसांनी आरोपी मुलास ताब्यात घेतले असून पुढील तपास करत आहेत. जिल्ह्यात खुनाच्या घटना वाढल्या असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. श्रीकिसन अंबादास तागड (वय 60 रा.पिंपळनेर ता.बीड) […]

Continue Reading

भिकार्‍याचे दोन लाख चोरट्यांनी पळवले, पोलीसांनी तीन तासात शोधून परत केले!

परळी दि.25 : आयुष्यभर भीक मागून पै-पै जमवलेल्या जवळपास पावणेदोन लाख रुपयांच्या रकमेवर चोरट्यांनी डल्ला मारला… पैसे चोरी गेल्याने चिंताग्रस्त भिकार्‍याची मदतीसाठी खाकीतला देव उभा राहिला. अन् अवघ्या तीन तासात चोरट्यांना पकडून भिकार्‍याला त्याची रक्कम सही सलामत सुपूर्द केली. याबद्दल पोलीसांचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे. बाबुराव नाईकवाडे असे त्यांचे नाव आहे. मागील अनेक वर्षांपासून […]

Continue Reading
Corona

आजचा आकडा अत्यंत दिलासादायक!

बीड दि.25 : मागील काही दिवसापासून कोरोना बाधितांचा आकडा कमी होताना दिसत आहे. मंगळवारी (दि.25) कोरोना बाधितांचा आकडा अत्यंत दिलासादायक आला आहे. जिल्ह्यात 749 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये बीड तालुका सर्वात आघाडीवर आहे. आरोग्य विभागाला मंगळवारी (दि.25) पाच हजार 318 संशयीतांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये तब्बल 749 जण बाधित आढळून आले. तर चार […]

Continue Reading
corona virus

आजचा कोरोना बधितांचा आकडा वाढला!

बीड : जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण आता हळूहळू कमी होताना दिसत आहे. सोमवारी (दि.24) रोजी 824 कोरोनाबाधित निष्पन्न झाले आहेत. जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, 6529 नमुन्यापैकी 5705 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर 824 रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत. तालुकानिहाय यादी

Continue Reading