माजलगावात खाद्य तेलाच्या गोडाऊनला भीषण आग

फुले पिंपळगाव : माजलगाव तालुक्यातील फुले पिंपळगाव येथे असलेल्या नवीन मोंढ्यातील संतोष मुळचंद अब्बड यांच्या महावीर ट्रेडिंग व रॉयल केअर या खाद्यतेल असलेल्या गोडाऊनला पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत कोट्यवधी रुपयांचे खाद्यतेलाचे नुकसान झाले आहे.आग लागल्याचे वॉचमनच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी अब्बड यांना घटनेची माहिती दिली. मात्र तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. घटना […]

Continue Reading
corona virus

आजही चिंताजनक आकडेवारी!

बीड दि.14 : जिल्ह्यात कोरोनाचा पॉझिटिव्हचा आकडा कमी होताना दिसत नाही. बुधवारी जिल्हा प्रशासनास 3 हजार 554 अहवाल प्राप्त झाले होते. त्यापैकी 928 पॉझिटिव्ह आले आहेत. तर 2 हजार 626 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. लॉकडाऊन असतानाही पॉझिटिव्हचा आकडा हजारच्या जवळपासच आहे. ही आकडेवारी कमी होण्यासाठी नियम पाळण्याची खुप मोठी गरज आहे. कोरोना पॉझिटिव्हची तालुकानिहाय आकडेवारी

Continue Reading
Corona

कोरोना पॉझिटिव्हची संख्या चिंताजनक!

बीड दि.13 : कालच्या दिलासादायक आकडेवारीनंतर आज पुन्हा धडकी भरवणारा आकडा समोर आला आहे. मंगळवारी जिल्हा प्रशासनाला 4 हजार 183 अहवाल प्राप्त झाले होते. त्यापैकी 1 हजार 18 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. तर निगेटिव्ह 3 हजार 165 रुग्ण आढळले आहेत. लॉकडाऊन असतानाही कोरोना पॉझिटिव्हचा आकडा वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. तसेच आज लॉकडाऊन […]

Continue Reading
corona virus

कालच्या आकडेवारीनंतर आज मोठा दिलासा

बीड दि.12 : रविवारी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा हा काळजात धडकी भरवणारा होता. आजच्या आकडेवारीवरुन मोठा दिलासा मिळाला आहे. सोमवारी जिल्हा प्रशासनाला चार हजार 858 अहवाल प्राप्त झाले होते. त्यापैकी निगिटिव्ह 4 हजार 155 तर पॉझिटिव्हचा आकडा 703 आला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्ण हे अंबाजोगाई तालुक्यात आढळून आले आहेत. तालुकानिहाय अहवाल जाणून घ्या…

Continue Reading

मंडळाधिकाऱ्याच्या गाडीला धडक देऊन टिप्पर पळवला

बीड दि. 10 : अवैध वाळू वाहतूक करणारा टिप्पर पाडळसिंगी टोलनाका परिसरात पकडला. यावेळी टिप्पर मालकाने मंडळाधिकाऱ्याच्या गाडीला धडक देऊन टिप्पर पळून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी शासकीय कामात अडथळा व जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शेख जुनैद चाँद (रा.माळापुरी ता.जि. बीड) असे आरोपीचे नाव आहे. मंडळअधिकारी अमोल सुधाकर कुरुलकर यांनी दिलेल्या फिर्यादीत […]

Continue Reading
MURDER

जागेच्या वादातून आईने केली मुलाची हत्या!

गेवराई दि.8 : जागेच्या वादातून सावत्र आईने कुर्‍हाडीने वार करुन मुलाची हत्या केल्याची खळबळजनक घटना तालुक्यातील लुखामसला येथे गुरुवारी (दि.8) रात्री घडली. याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, भगवान डोमाळे (रा.लुखामसला ता.गेवराई) यांना दोन पत्नी आहेत. व सात अपत्य आहेत. यापैकी […]

Continue Reading

कन्हैय्या हॉटेलमध्ये विवाह ; वधुवरासह 300 जणांवर गुन्हा

नेकनूर दि.7 : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात लॉकडाऊन करण्यात आले आहे. तसेच सर्वत्र जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. असे असताना बीड तालुक्यातील कन्हैय्या हॉटेल येथे मोठ्या जल्लोषात विवाह सोहळा संपन्न झाला. याची माहिती पोलीस प्रशासनाला होताच हॉटेलमालक, वधुवरांसह तीनशे जणांवर नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धुळे-सोलापूर महामार्गावरील मांजरसुंबा परिसरातील कन्हैय्या लॉन्स […]

Continue Reading
corona virus

बीड जिल्हा; आजची आकडेवारी आली समोर

बीड दि.7 : जिल्ह्यात कोरोनाचा बुधवारी (दि.7) कालच्या तुलनेत थोडे दिलासादायक आकडेवारी समोर आली आहे. जिल्ह्यात 580 पॉझिटिव्ह आढळून आले.     जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार, 3 हजार 529 अहवाला प्राप्त झाले असून त्यापैकी 2 हजार 949 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर 580 कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. यात बीड तालुक्यात सर्वाधिक 146, अंबाजोगाई तालुक्यात 114, […]

Continue Reading
CORONA DEATH

एकाच चितेवर आठ जणांना अग्निडाग!

कोरोना बाधितांबरोबर मृतांचा आकडाही वाढू लागला अंबाजोगाई दि.6 : जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोना बाधितांचा आकडा हा सातशेच्या पुढे पोहचला आहे. तसेच मृतांची संख्याही वाढतांना दिसत आहे. मंगळवारी (दि.6) स्वाराती रुग्णालयात सात व लोखंडीच्या कोविड सेंटरमधील एक अशा एकूण आठ कोविड मृतांवर नगरपालिका प्रशासनाने मांडवा रोडवरील स्मशानभूमीत एकाच सरणावर अग्निडाग देण्यात […]

Continue Reading
Corona

बीड जिल्हा; 716 पॉझिटिव्ह

बीड : जिल्ह्यात कोरोनाचा मंगळवारी (दि.6) स्फोट झाल्यासारखी परिस्थिती आहे. लॉकडाऊन काळातील सर्वाधिक रूग्णसंख्येची नोंद झाली आहे. आष्टी तालुक्यातील एकाच गावात 20 पेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहेत. तर जिल्ह्यात 716 पॉझिटिव्ह आढळून आले.जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार, 2 हजार 237 अहवाला प्राप्त झाले असून त्यापैकी 1 हजार 521 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर तब्बल 716 कोरोना […]

Continue Reading