अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने तहसीलदारांच्या गाडीला दिली धडक

बीड दि. 6 : अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने तहसीलदार यांच्या गाडीला धडक दिली. ही घटना मंगळवारी (दि.6) सकाळी घडली. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले असून अन्य एक फरार आहे. बीड तालुक्यातील ढेकनमोहा परिसरात अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर तहसीलदार शिरीष वमने यांनी अडविला. मात्र ट्रॅक्टर चालकाने थेट तहसीलदार यांच्या गाडीला ट्रॅक्टरची धडक दिली. या […]

Continue Reading
ACB TRAP

एक हजाराची लाच घेतांना शाखा अभियंता पकडला

 गेवराई दि.5 : ग्रामपंचायत येथे नवीन सार्वजनिक शौचालय बांधण्यासाठी अंदाजपत्रकाची तांत्रिक मान्यता देण्यासाठी एक हजार रुपयाची लाच स्विकारताना शाखा अभियंता यास एसीबीने रंगेहाथ पकडले. ही कारवाई सोमवारी (दि.5) दुपारी गेवराई येथे करण्यात आली. शेख समद नूर मोहम्मद (वय- 57 वर्ष पद शाखा अभियंता (स्थापत्य) ग्रामीण पाणी पुरवठा उप विभाग जिल्हा परिषद गेवराई) असे आरोपीचे नाव […]

Continue Reading
Corona

बीड जिल्हा; 383 पॉझिटिव्ह

बीड : लॉकडाऊन असुनही कोरोना रूग्णसंख्या वाढतच आहे. शुक्रवारी प्राप्त झालेल्या कोरोनाचा आकडा चारशेच्या घरात आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोना नियमाचे पालन करणे गरजेचे आहे.मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांच्या माहितीनुसार, जिल्हा प्रशासनाला शुक्रवारी 2 हजार 679 अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 383 अहवाल पॉझिटिव्ह तर 2 हजार 296 इतके अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यात सर्वाधिक बीड […]

Continue Reading
atyachar

राष्ट्रवादीच्या नेत्याकडून महिलेवर लैंगिक अत्याचार

मुंबई : राष्ट्रवादीच्या आणखी एका नेत्याकडून महिलेवर लैंगिक अत्याचार झाल्याचा खळबळजनक आरोप भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी केला आहे. फेसबूक पोस्टच्या माध्यमातून तृप्ती देसाईंनी हा दावा केला. पीडितेसह पत्रकार परिषद घेत नेत्याचं बिंग फोडण्याचा इशाराही देसाईंनी दिला आहे. एका राष्ट्रवादीच्या नेत्याकडून लग्नाच्या, नोकरीच्या अमिषाने एका महिलेवर लैंगिक अत्याचार तृप्ती देसाई यांची बारा वाजता पीडितेसह […]

Continue Reading

रामगड झाला पोरका; महंत लक्ष्मण महाराज यांना देवाज्ञा

बीड : तालुक्यातील श्री क्षेत्र रामगड येथील मठाधिपती हभप महंत लक्ष्मण महाराज रामगडकर यांना मंगळवारी (दि.30) सकाळी 10 च्या सुमारास देवाज्ञा झाली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. हभप लक्ष्मण महाराज हे मागील काही दिवसापासून आजारी होती. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान मंगळवारी सकाळी त्यांना देवाज्ञा झाली. त्यांच्या निधनाने रामगड पोरका […]

Continue Reading
crime

क्षुल्लक कारणावरुन मित्रावर चाकूने वार; उपचारादरम्यान मृत्यू

नवीन बस स्थानकातील घटना; तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल  माजलगाव दि.26 : शहरातील आझाद नगर भागात वास्तव करीत असलेल्या भागवत अशोक आगे व त्याचा मित्र महेश अशोक सोळंके यांच्यात मंगळवारी (दि.23) क्षुल्लक कारणावरून नवीन बसस्थानकात मारहाण झाली. यावेळी चाकूने वार केल्यामुळे भागवत आगे हा गंभीररित्या जखमी झाला होता. त्याचा शुक्रवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी तिघांवर […]

Continue Reading

बीडच्या बीएससी अ‍ॅग्री महाविद्यालयातील विद्यार्थीनीचा पाचोडमध्ये मृतदेह आढळला

  पैठण दि.26 : बीड येथील बीएससी अ‍ॅग्री महाविद्यालयामध्ये शिक्षण घेणार्‍या 21 वर्षीय विद्यार्थिनीचा पैठण तालुक्यातील पाचोड खुर्द येथील विहीरीत मृतदेह आढळून आला आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजू शकले नाही. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनीषा शिवाजी वाघ (वय 21 रा.पाचोड खुर्द ता.पैठण) हीचा ग्रामपंचायतच्या विहिरीमध्ये शुक्रवारी (दि.26) सकाळी […]

Continue Reading
MURDER

जानेगाव येथे महिलेचा खून

केज दि.25 : शेतात दगडाने ठेचून महिलेचा खून केल्याची घटना केज तालुक्यातील जानेगाव शिवारात गुरुवारी (दि.25) रात्रीच्या सुमारास घडली. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार आशा अनिल चटप (वय 35) असे मयत महिलेचे नाव आहे. जानेगाव परिसरामध्ये घराच्या शेजारीच शेतात त्यांचा मृतदेह आढळून आला. घटनास्थळी गावातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. घटनेची माहिती मिळताच युसूफवडगाव पोलीस ठाण्याचे सपोनि.संदीप […]

Continue Reading
acb trap

गेवराईत एसीबीची मोठी कारवाई

बीड दि.22 : गेवराई शहरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पाच हजार रुपयांची लाच स्विकारताना कृषी पर्यवेक्षकास रंगेहाथ पकडले. ही कारवाई सोमवारी (दि.22) सायंकाळाच्या सुमारास करण्यात आली. संदीप सुभाष देशमुख (कृषि पर्यवेक्षक) लाच स्विकारणार्‍या आरोपीचे नाव आहे. तक्रारदाराकडे देशमुख याने शेततलावाच्या अस्तरीकरणाचे बील काढण्यासाठी पंधरा हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती पाच हजाराची लाच स्विकारतांना गेवराई येथील […]

Continue Reading
corona virus

बीड जिल्हा; तिनशे पार

बीड दि.19 : दिवसेंदिवस कोरोना पॉझिटीव्हचा आकडा वाढतच आहे. रविवारी प्रशासनाला 1708 अहवाल प्राप्त झाले हेाते. त्या अहवालापैकी 336 पॉझिटिव्ह आले आहे. त्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करण्याची नितांत गरज आहे.       रविवारी (दि.21) दुपारी आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहिती नुसार 1708 अहवाला पैकी 1372 अहवाला निगेटिव्ह आले तर 336 रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात बीड […]

Continue Reading