corona pecaint suicide

गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या

गेवराई दि.6 : कर्जबाजारीपणाला कंटाळून एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गेवराई तालुक्यातील रेवकी येथे रविवारी सकाळी घडली.भागवत आसाराम चोरमले (वय 26 रा.रेवकी ता.गेवराई) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. या शेतकऱ्याने रविवारी (दि.7) रेवकी येथे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्याकडे बँकेचे कर्ज होते. घटनास्थळी गेवराई पोलिसांनी धाव घेतली असून या […]

Continue Reading

‘डॉन’ने घेतला अखेरचा श्वास

बीड दि.6 : बीड पोलीस दलातील श्वान ‘डॉन’ ने शनिवारी (दि.6) सकाळी अखेरचा श्वास घेतला. डॉन हा एक वर्षांपूर्वी निवृत्त झाला होता. त्याने पोलीस दलात उल्लेखनीय कार्य बजावलेले आहे. मागील सहा महिन्यांपासून तो आजारी होता. आज सकाळी त्याने अखेरचा श्वास घेतला. डॉनचा 11 वर्ष वयाचा होता. डॉनने भोपाळ येथे नॅशनल चॅम्पियन पदक पटकावले होते. योगेश्वरी […]

Continue Reading

गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या

जातेगाव दि.6 : कर्जबाजारीपणाला कंटाळून एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गेवराई तालुक्यातील जातेगाव तांडा येथे घडली. विजय श्रीराम पवार (वय 50 रा.जातेगाव तांडा, ता.गेवराई) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. या शेतकऱ्याने शनिवारी (दि.6) जातेगाव येथील महाराष्ट्र बँकेचे त्याच बरोबर खाजगीत थकीत कर्ज व नापीकीस, अतिवृष्टीला कंटाळून घराशेजारी असलेल्या चिंचेच्या झाडाला गळफास […]

Continue Reading
MURDER

मुलबाळ होत नसल्याने पत्नीचा खून!

बीड दि. 6 : पत्नीला लाकडी दांड्याने बेदम मारहाण करत खून करण्यात आला. ही घटना बीड तालुक्यातील औरंगपूर येथे गुरुवारी घडली आहे. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.राधा महादेव रेड्डे (वय 32 ) असे मयत महिलेचे नाव आहे. महादेव आसाराम रेड्डी असे आरोपीचे नाव असून दोघे बीड तालुक्यातील औरंगपूर येथील […]

Continue Reading

शाळेत खेळण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्याचा आढळला मृत्यूदेह

खून असल्याचा नातेवाईकांचा आरोप नेकनूर दि.3 : शाळेत खेळण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि.3) सकाळी नेकनूर जवळील रत्नागिरी ( ता.बीड ) येथे घडली . शाळेच्या आवारातच त्याचा मृतदेह आढळुन आल्याने खळबळ उडाली आहे. त्याच्या गळ्यावर असलेल्या जखमा पाहता हा खूनाचा प्रकार असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मयत विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी […]

Continue Reading

परराज्यातील चार लाखाची विदेशी दारू बीडमध्ये पकडली

बीड दि.31 : शिरुर कासार तालुक्यातील पिंपळनेर येथे गोवा राज्यात निर्मित व महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित असणाऱ्या विदेशी मद्याच्या 50 पेट्यांचा साठा जप्त केला. महाराष्ट्र राज्यातील दराप्रमाणे जप्त केलेल्या दारुची एकूण किंमत रुपये 3 लाख 64 हजार 800 इतकी आहे. ही कारवाई 31 जानेवारी रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या बीड व अहमदनगर जिल्ह्यांच्या संयुक्त पथकाने […]

Continue Reading
accident

बसच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू

बीड दि.30 : भरधाव बसने दिलेल्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी (दि.30) माजलगाव शहराजवळील पाथरी रोडवर झाला. यामध्ये दोघे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.शुभम अनंतराव सुरवसे (वय 27 रा.देवगाव ता.वडवणी) व गणेश जेटे (वय 23 रा.घाळटवाडी ता.माजलगाव) व अन्य तिघे हे दोन दुचाकीवरुन (एमएच 44 व्ही-6182) माजलगावरुन […]

Continue Reading

बीडमध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर हल्ला!

बीड दि.28 : शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्यावर हल्ला केल्याची घटना गुरुवारी (दि.28) रात्रीच्या सुमारास घडली. जखमी पदाधिकाऱ्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. परमेश्वर सातपुते असे जखमी पदाधिकाऱ्याचे नाव आहे. त्यांच्याकडे शिवसेना किसान सेनेचे पद आहे. गुरुवारी रात्री शहरातील स्वराज्यनगर परिसरात त्यांच्या गाडीवर अज्ञातानी हल्ला केला. यामध्ये गाडीची तोडफोड केली असून त्यांनाही मारहाण करण्यात आली आहे. या […]

Continue Reading
r raja

राजा रामास्वामी यांना शौर्यपदक

  बीड  दि.25 : शौर्यपूर्ण कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक राजा रामास्वामी यांना पोलीस शौर्यपदक जाहीर करण्यात आले आहे. यामुळे बीड पोलीस दलाची मान उंचवणारा हा सन्मान आहे. 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त शौर्यपूर्ण कामगिरीसाठी पोलीस शौर्यपदक, उल्लेखनिय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक व गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल पोलीस पदक दिले जाते. बीडचे पोलीस अधीक्षक राजा रामास्वामी यांना शौर्यपूर्ण कामगिरीबद्दल […]

Continue Reading
accident

टेम्पोच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू

गेवराई  दि.25 : गेवराई शहराजवळील विठ्ठलनगर येथे धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर टेम्पो व दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि.25) सायंकाळच्या सुमारास घडली. बाबासाहेब तुळशीराम सौंदलकर (वय 55 रा.रेवकी ता.गेवराई), गोरख लिबांजी शेंडगे (वय 45 रा.रेवकी ता.गेवराई) अशी अपघातातील मयताची नाव आहे. ही दोघे दुचाकीवरुन गेवराईवरुन विठ्ठलनगर येथे […]

Continue Reading