atyachar

आणखी एका बलात्काराच्या आरोपाने बीड हादरले

बीडः बीड जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्या एका पोलीस उपाधिक्षकाविरुध्द मुंबईत बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. मुंबई पोलीसातिलच एका सहाय्यक पोलीस निरीक्षक महिलेच्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मुंबई पोलीसातील एका सहाय्यक पोलीस निरीक्षक असलेल्या महिलेने पोलीस वाळके उपाधिक्षकाविरुध्द फिर्याद दिली होती. या तक्रारिची विशाखा समितीने चौकशी केली. त्यानंतर मुंबईच्या रफी अहमद किडवइ मार्ग पोलीस ठाण्यात […]

Continue Reading

वडवणी न.प.च्या मुख्याधिकार्‍यास मारहाण

बीड दि.19 : किरकोळ वादातून इंजिनिअरने वडवणी न.प.च्या मुख्याधिकार्‍यास बेदम मारहाण केली. हा प्रकार मंगळवारी (दि.19) सायंकाळच्या सुमारास घडला. या प्रकरणी जखमी मुख्याधिकारी यांना उपचारसाठी रुग्णालात हलवण्यात आले आहे. वडवणी न.प.चे मुख्याधिकारी पाटील यांना एका इंजिनिअरने मारहाण केली. यामध्ये त्यांच्या हाताला गंभीर जखम झाली आहे. घटनास्थळी वडवणी पोलीसांनी धाव घेत जखमी पाटील यांना उपचारासाठी वडवणी […]

Continue Reading
rahul rekhawar

जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची बदली

बीड दि.19 : महिनाभरापासून बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या बदलीची चर्चा होती. अखेर त्यांची बदली करण्यात आली असून बीड येथे सध्या औरंगाबादला सहायक विक्रीकर आयूक्त म्हणून कार्यरत असलेले आर.एस. जगताप हे जिल्हाधिकारी म्हणून येणार आहेत.ग्रामपंचायत निवडणूकीची आचारसंहिता शिथील होताच राहुल रेखावार यांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले आहेत. राहुल रेखावार यांना विक्रीकर विभागाच्या आयूक्तपदी मुंबई येथे […]

Continue Reading

दगडाने ठेचून तरुणाचा खून

बीड दि.11: दगडाने ठेचून एका तरुणाचा खून केल्याची घटना चर्हाटा-शिवदरा रोडवर घडली. सोमवारी (दि.11) सकाळी हा प्रकार उघडकीस आला. प्रकाश गायकवाड (रा.अंकुशनगर ता.बीड) असे मयताचे नाव आहे. सोमवारी सकाळी त्याचा मृतदेह बीड शहराजवळील चर्हाटा-शिवदरा रोडच्या कडेला आढळून आला. घटनास्थळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भारत राऊत यांनी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे. बीड […]

Continue Reading

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परने शेतकऱ्यास चिरडले; नातेवाईकांचा आक्रोश

गेवराई : सकाळी शेतामध्ये जात असलेल्या शेतकऱ्यास अज्ञात वाळूच्या हायवा टिप्परने चिरडले. नातेवाईकांनी मृतद्देह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. घटनास्थळी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. ही घटना सोमवारी सकाळी 6.30 च्या दरम्यान घडली. गंगावाडी येथील शेतकरी रुस्तुम मते (वय 60) हे सकाळी 6.30 च्या दरम्यान आपल्या शेतामध्ये चक्कर मारण्यासाठी जात असताना राक्षस भुवन येथून अवैधरित्या […]

Continue Reading

‘त्या’ मृतदेहाची ओळख पटली

अंमळनेर  दि.31 : खून करून चेहरा विद्रुप करून झुडपात फेकण्यात आला होता. सदरील इसमाची गुरुवारी सकाळी ओळख पटली. तो मृतदेह पाटोदा तालुक्यातील साबळेवाडी येथील दिलीप विठोबा साबळे यांचा असल्याचे निष्पन्न झाले आहे. बायोमेट्रिक मशिनच्या साह्याने आधार कार्ड वरून ओळख पटवली आहे.सदरील इसमाच्या अंगावर तिक्ष्ण हत्याराने वार करुन चेहर्‍यावर अ‍ॅसिड टाकून चेहरा विदृप करण्यात आला होता. […]

Continue Reading

अंगावर वार, चेहर्‍यावर अ‍ॅसिड टाकून विदृप केलेला इसमाचा मृतदेह आढळला

अंमळनेर  दि.30 : एका 40 ते 50 वर्षीय इसमाच्या अंगावर तिक्ष्ण हत्याराने वार करुन चेहर्‍यावर अ‍ॅसिड टाकून चेहरा विदृप करण्यात आला आहे. सदरील मृतदेह डोंगरकिन्ही परिसरात बुधवारी (दि.30) आढळून आला आहे. सदरील मयताची ओळख पटलेली नसून हा खुनाचा प्रकार असल्याचा अंदाज अंमळनेर पोलीसांनी व्यक्त केला असून पुढील तपास पोलीस करत ओहत. पाटोदा तालुक्यातील अंमळनेर पोलीस […]

Continue Reading
acb office beed

शिवाजीनगर ठाण्यातील लाचखोर पोलीस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

 बीड दि.27 : शहरातील बसस्थानक परिसरातील पोलीस चौकीमध्ये एका पोलीस कर्मचार्‍यास सात हजाराची लाच घेतांना रंगेहाथ पकडले. रविवारी (दि.27) दुपारच्या सुमारास बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. चरणसिंग वळवी असे पोलीस कर्मचार्‍याचे नाव आहे. वळवी यांची शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नियुक्ती आहे. शिवाजीनगर ठाण्यात एनसी दाखल होती. यातील आरोपींवर कारवाई न करण्यासाठी आरोपीनाच वळवी […]

Continue Reading

स्विमिंग कोचची गळफास घेऊन आत्महत्या

बीड – शहरातील चंपावती क्रीडा मंडळ येथील स्विमिंग कोचने येथीलच शौचालयामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. शहरातील पालवन चौकात असलेल्या बांधकाम विभागाच्या मध्ये राहणारा अक्षय कांबळे हा गेल्या काही वर्षांपासून चंपावती क्रीडा मंडळ येथे असलेल्या स्वीमिंग पूल येथे प्रशिक्षक म्हणून काम करत होता. रात्री त्याने स्वीमिंग पूल […]

Continue Reading
golibar

डोंगरकिन्ही बसस्थानकात गोळीबार!

बीड दि.23 : पाटोदा तालुक्यातील डोंगरीकिन्ही बसस्थानक परिसरात गोळीबार झाल्याची घटना बुधवारी (दि.23) सायंकाळच्या सुमारास घडली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी अंमळनेर पोलीसांनी धाव घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पाटोदा तालुक्यातील डोंगरकिन्ही येथील बसस्थानक परिसरामध्ये गोळीबार करण्यात आला. जमीनीच्या वादातून हा गोळीबार केला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. याची माहिती मिळताच अंमळनेर पोलीस […]

Continue Reading