न्यूज ऑफ द डे

मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर

By Shubham Khade

July 07, 2022

echo adrotate_group(3);

बीड जिल्ह्यात भव्य स्वागत करणार : जिल्हाध्यक्ष सुमंत धस

बीड : मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र तथा मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे 16 जुलैपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दरम्यान बीड जिल्ह्यात येत आहे. त्यांच्या स्वागताचे भव्य-दिव्य नियोजन करण्यात येईल, अशी माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमंत धस यांनी दिली आहे.echo adrotate_group(6);

सुमंत धस यांनी पत्रकात पुढे म्हटले की, मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांचा 16 ते 25 जुलै असा दहा दिवसांचा त्यांचा दौरा असणार आहे. या दरम्यान ते पक्षाच्या बैठका, विध्यार्थी सेनेचे बांधणी करणार आहेत. धाराशिव जिल्ह्यातून या दौऱ्याला सुरवात होणार असून शेवट संभाजीनगरला होणार आहे. त्यामुळे मराठवाड्यातील मनसैनिकांचे या दौऱ्याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, 22 जुलै रोजी बीड जिल्ह्यात आगमन व मुक्काम असेल. दुसऱ्या दिवशी 23 जुलै रोजी बीड जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक व मार्गदर्शन करतील. त्यानंतर संभाजीनरला जाणार आहेत, असे जिल्हाध्यक्ष सुमंत धस यांनी म्हटले आहे. या दौऱ्यात ते पक्षाच्या बैठका, विद्यार्थी सेनेचे बांधणी आणि आगामी निवडणुकीच्या दृष्टीने आढावा घेण्याची शक्यता आहे.echo adrotate_group(8);

असा आहे दौरा16 जुलै रोजी धाराशिव येथे आगमन व मुक्काम. 17 जुलै रोजी तुळजापुर येथे तुळाजा भवानी मातेचे दर्शन व त्यानंतर उस्मानाबाद जिल्हा पदाधिकाऱ्याची बैठक व मार्गदर्शन. 17 जुलै रोजी लातुर जिल्ह्यात आगमन व मुक्काम. 18 जुलै रोजी लातुर जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक व मार्गदर्शन. 18 जुलै रोजी नांदेड जिल्ह्यात आगमन व मुक्काम. 19 जुलै रोजी नांदेड जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक व मार्गदर्शन. 19 जुलै रोजी हिंगोली जिल्ह्यात आगमन व मुक्काम. 20 जुलै रोजी हिंगोली जिल्ह्यात पदाधिकाऱ्यांची बैठक व मार्गदर्शन. 20 जुलै परभणी जिल्ह्यात आगमन व मुक्काम. 21 जुलै रोजी परभणी पदाधिकाऱ्यांची बैठक व मार्गदर्शन. 21 जुलै रोजी जालना जिल्ह्यात आगमन व मुक्काम. 22 जुलै रोजी जालना जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक व मार्गदर्शन. 22 जुलै रोजी बीड जिल्ह्यात आगमन व मुक्काम. 23 जुलै रोजी बीड जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक व मार्गदर्शन. 23 जुलै रोजी संभाजीनगर येथे जिल्ह्यात आगमन व मुक्काम. 24 जुलै रोजी संभाजीनगर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक व मार्गदर्शन. 25 जुलै रोजी सोयीनुसार मुंबईकडे प्रयाण करतील.echo adrotate_group(9);

मनसेत काम करू ईच्छिणाऱ्या तरुणांचा प्रवेशमहाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेमध्ये काम करू ईच्छिणाऱ्या तरुणांनी मनसेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष सुमंत धस यांनी केले. या तरुणांचा अमित ठाकरे साहेब यांच्या हस्ते त्यांचा प्रवेश घेतला जाईल, असे धस यांनी म्हटले आहे. echo adrotate_group(1);