न्यूज ऑफ द डे

मोठी बातमी! जि.प., पं.स.ची आरक्षण सोडत स्थगित

By Shubham Khade

July 12, 2022

राज्य निवडणूक आयोगाचे आदेश

बीड : जिल्हा परिषद, पंचायत समित्यांसाठी दि.१३ रोजी होणारी आरक्षण सोडत पुढे ढकलली आहे. ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला.

राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठीची आरक्षण सोडत रद्द करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने आज दिले. सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाची याचिका सुरु असून त्यात १९ जुलैला पुढील सुनावणी असल्याचा दाखला देत आयोगाने आरक्षण सोडत पुढे ढकलली आहे.