करिअर

सैन्यदल अग्निवीर पदभरती नोंदणीसाठी 30 जुलै अंतिम मुदत

By Shubham Khade

July 13, 2022

राहुरीला सहा जिल्ह्यातील इच्छुकांसाठी 23 ऑगस्टपासून भरती मेळावा

बीड : अग्निपथ भरती योजनेद्वारे भारतीय सैन्यदलात अग्निवीर पदभरतीसाठी नावनोंदणी प्रकिया सुरू झाली असून, ऑनलाईन नावनोंदणी करण्याची अंतिम तारीख दि. 30 जुलै आहे.

भरती कार्यालय, पुणे यांच्यावतीने महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, जि. अहमदनगर येथे दि. 23 ऑगस्ट ते दि. 11 सप्टेंबर या कालावधीत भरती मेळाव्याचे आयोजन केले आहे. बीडसह पुणे, अहमदनगर, लातूर, उस्मानाबाद आणि सोलापूर अशा सहा जिल्ह्यांतील भऱतीसाठी इच्छुक उमेदवारांसाठी हा भरती मेळावा होणार आहे. अग्निवीर जनरल ड्युटी, तांत्रिक, लिपिक, स्टोअर किपर टेक्निकल आणि अग्निवीर ट्रेडस्मन या पदांसाठी हा मेळावा होणार आहे. यासाठी आठवी, दहावी व बारावी पास अशी शैक्षणिक अर्हता आवश्यक आहे. त्यासाठी www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी.