antigen test swab

बीड

आजचे सर्व स्वॅब निगेटीव्ह; अतिशय दिलासादायक बातमी

By Karyarambh Team

June 13, 2020

echo adrotate_group(3);

बीड : पालकमंत्री धनंजय मुंडे कोरोना पॉझिटीव्ह आढळून आल्यानंतर जिल्ह्याचं टेन्शन प्रचंड वाढलेलं आहे. कारण मुंडे यांच्या संपर्कात जिल्ह्यातील प्रशासकीय, राजकीय वर्तुळातील व्यक्ती आलेले होते. त्या अनुषंगाने नजिक संपर्कात आलेल्या अनेकांनी आपले स्वॅब तपासणीसाठी दिलेले होते. या सर्वांचे स्वॅब निगेटीव्ह आले आहेत. आता आणखी उद्याचा दिवस अतिशय महत्वाचा असून जिल्ह्यातील अनेक प्रमुख राजकीय व प्रशासकीय व्यक्तींचे स्वॅब थोड्यावेळापुर्वी घेण्यात आले आहेत. त्यांचा रिपोर्ट उद्या येणार असून त्यानंतर खर्‍या अर्थाने जिल्ह्याचं टेन्शन निवळणार आहे.echo adrotate_group(7);

बीड जिल्ह्यात जिल्हाधिकार्‍यांपासून ते पोलीस पोलीस कॉन्स्टेबल पर्यंत व लोकप्रतिनिधींपासून कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांनीच पालकमंत्री धनंजय मुंडे पॉझिटीव्ह आल्यानंतर स्वतःला सेल्फ क्वारंटाईन करून घेतलेले आहे. काल सायंकाळी मुंडे यांच्या स्वीय सहायकासह अन्य एका लोकप्रतिनिधीचा स्वॅब निगेटीव्ह आलेला होता. तर आज दुपारीच मुंडे यांच्या कुटुंबियांचे स्वॅब निगेटीव्ह आले होते. तर सायंकाळी येणार्‍या स्वॅबकडेही सर्वांचे लक्ष लागलेले होते. हे सर्व स्वॅब निगेटीव्ह आलेले आहेत.echo adrotate_group(8);

आज एकूण 64 स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आलेले होते. त्यापैकी 59 निगेटीव्ह तर 5 स्वॅब रिजेक्ट करण्यात आले असून ते पुन्हा घेतले जाणार आहेत,  अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.echo adrotate_group(9); echo adrotate_group(10);