travels froud

विनापरवाना प्रवाशी वाहतूक करणार्‍या ट्रॅव्हल्स चालकासह मालकावर गुन्हा

क्राईम बीड

  पाटोदा : एका व्यक्तीच्या नावे पास असतांना पुण्यावरुन दुसरीच विनापास प्रवाशी ट्रॅव्हल्समध्ये बोगसरित्या बसवून आणल्या प्रकरणी टॅव्हल्स चालक व मालकावर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पाटोदा पोलीसांनी केली आहे.
       शौकत अहमद शेख असे ट्रॅव्हल्स (एमएच-23 डब्लू-4560) मालकाचे नाव आहे. तर शेख मेहबुब शेख उस्मान असे चालकाचे नाव आहे. यांनी पुणे ते बीड असा प्रवाशी पास शौकत अहमद शेख यांच्या नावे काढला होता. व टॅ्रव्हल्स चालक हा मालकाच्या पासचा वापर करुन प्रवास करत होता. शुक्रवारी (दि.12) सायंकाळी पाचच्या सुमारास पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने हे गस्तीवर असतांना चुंबळी फाट्यावर मांजरसुंबा रोडने जातांना ट्रॅव्हल्स आढळून आली. ट्रॅव्हल्सला थांबवून तपासणी केली. यावेळी चालकाकडे मालकाचा पास आढळून आला. तसेच बसमध्ये विनापास राहुल बाळासाहेब दांगट, शेख सल्लाउद्दीन नजीज ही दोघे आढळून आले. या प्रकरणी जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या परवान्याचे उल्लंघन करुन त्याचा गैरवापर करुन शासनाची फसवणुक केली म्हणून पाटोदा पोलीस ठाण्यात पोह.सखाराम गंठाळे यांच्या फिर्यादीवरुन कलम 420,188, 269, 270, 34 कलम 66/192, 130/177 भादंवि मोटरवाहन कायदा सह 51 (ब), आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वैशाली पेठकर करत आहेत.

ट्रॅव्हल्समध्ये आढळली दुचाकी
यावेळी या टॅव्हल्समध्ये एक पुण्याहून आणलेली दुचाकी आढळून आली. पोलीसांनी दुचाकीही जप्त केली आहे. पुढील तपास मपोउपनि.वैशाली पेठकर या करत आहेत.

Tagged