vinayak mete

बीड

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री विनायक मेटेंच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहणार

By Shubham Khade

August 14, 2022

echo adrotate_group(3);

जिल्हा प्रशासनाकडून तयारी सुरू

बीड : मुंबईनजीक झालेल्या अपघातात शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी आमदार विनायकराव मेटे यांचे निधन झाले. शहरातील रिलायन्स पेट्रोल पंपापाठीमागे कॅनॉल रोड, सिद्धिविनायक पार्कमध्ये उद्या (दि.15) दुपारी 3.30 वाजता अंत्यविधी होणार आहेत. मेटे यांच्या अंत्यविधीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयातील सुत्रांनी दिली आहे.echo adrotate_group(7);

बीड शहरातील रिलायन्स पेट्रोल पंपापाठीमागे कॅनॉल रोड, सिद्धिविनायक पार्कमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अंत्यविधीसाठी निश्चित करण्यात येणाऱ्या जागेची पाहणी आमदार संदीप क्षीरसागर, पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, पोलीस उपाधीक्षक संतोष वाळके, बीड ग्रामीणचे संतोष साबळे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख खांडे यांच्यासह शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर कोलंगडे, नारायण काशीद, विनोद कवडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केली. दरम्यान, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या दौऱ्याच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. तसेच, शासकीय ईतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या हालचाली प्रशासकीय पातळीवर सुरू आहेत.echo adrotate_group(8); echo adrotate_group(1);echo adrotate_group(9);