सिरसाळा-परळी रोडवर भिषण अपघात
सिरसाळा दि.30 : सिरसाळा – परळी रोडवर मंगळवारी (दि.30) सकाळी १०:३० वाजताच्या दरम्यान दोन करचा समोरासमोर धडक होऊन भिषण अपघात झाला. या अपघातात दिंद्रूड पोलीस ठाण्यातील महिला पोलीस कर्मचारी कोमल शिंदे व त्यांचा ९ वर्षाचा मुलगा यांचा मृत्यू झाला. तर गाडी चालक पोलीस कर्मचारी नवनाथ लटपटे, डाॅ.इलियास हे या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ सिरसाळा पोलीसांनी व नागरिकांनी अंबाजोगाई शासकीय रुग्णालयात पाठवले आहे. हा अपघात सिरसाळा येथील परळी रोडवरील प्रगती मंगल कार्यालया समोर घडला आहे. अपघात एवढा भिषण होता कि दोन्ही गाड्या रस्त्याच्या बाजूच्या खड्ड्यात एकमेकावर पडल्या आहेत.
