माजलगाव

माजलगाव धरणाच्या पाणी पातळीत वाढ

By Karyarambh Team

June 14, 2020

उपायुक्त साठा ६३ द.ल.घ.मी.; पाणलोट क्षेत्रात पाऊस

माजलगाव : येथील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात शनिवारी झालेल्या एक दिवसाच्या पावसामुळे पाणी पातळीत ३ से.मी.ने वाढ झाली, असल्याची माहिती माजलगाव धरण शाखा अभियंता बी.आर.शेख यांनी दिली.मागील वर्षी माजलगाव धरण पावसाळ्यात ही मृत साठ्यात होते. मात्र परतीच्या पाऊसाने दमदार हजेरीमुळे १०० टक्के भरले होते. यावर्षी पावसाने उत्तम हजेरी लावली असून सध्या माजलगाव धरणाची पाणी पातळी २० टक्के आहे. एकाच दिवशी शनिवार दि.१३ रोजी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे ३ से.मी.ने पाणी पातळीत वाढ झाली आहे. सध्या धरणाची पाणी पातळी ४२७.७० द.ल.घ.मी. असून २०५ द.ल.घ.मी. एकूण साठा आहे. उपायुक्त साठा ६३ द.ल.घ.मी. असल्याची माहिती माजलगाव धरणाचे शाखा अभियंता बी.आर.शेख यांनी ‘कार्यारंभ’शी बोलताना दिली.