क्राईम

सहायक सरकारी वकील एसीबीच्या जाळ्यात!

By Keshav Kadam

September 20, 2022

बीड दि.20 : निकालाची प्रत काढून देण्यासाठी तक्रारदाराला 1500 रुपयांची लाच मागितली. ही लाच स्वीकारताना धारूर न्यायालयात सहायक सरकारी वकील यांना बीड एसीबीने रंगेहाथ पकडले.

सुरेखा लांब (वायबसे) सहायक सरकारी वकील, धारूर असे लाच स्वीकारणाऱ्या महिलेचे नाव आहे. त्यांनी तक्रारदारास निकालाची प्रत काढून देण्यासाठी 1500 रुपयांच्या लाचेची मागणी केली. ही लाच स्वीकारताना मंगळवारी (दि.20) दुपारी लांब यांना धारूर न्यायालयात रंगेहाथ पकडले. या प्रकरणी धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र परदेशी व त्यांच्या टीमने केली.