galfas sucide, atmahatya, fashi,

अतिवृष्टीमुळे राजेगावात तरूणाची आत्महत्या

क्राईम न्यूज ऑफ द डे

माजलगाव तालुक्यातील प्रकार
प्रतिनिधी। माजलगाव
दि.19 ः परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेले पिक पाण्यात गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना माजलगाव तालुक्यातील राजेगाव येथे बुधवारी (दि.19) सकाळीच्या सुमारास घडली.
रामेश्वर लक्ष्मण रकटे (वय-23) असे आत्महत्या केलेल्या तरूणांचे नाव आहे. परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेल्यामुळे व शेत पिकाचे मोठ्या प्रमाणात झालेले नुकसान पाहुन उदविग्न होत त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. रामेश्वर रकटे यांच्याकडे दीड एकर शेती असून त्या शेतीमध्ये सोयाबीन कापूस व कांदा लागवड केलेला आहे. पंरतू परतीच्या पावसाने आपल्या शेतातील पीक पाण्यात गेल्यामुळे रामेश्वर रकटे यांनी आत्महत्या केली. शासनाकडून व विमा कंपनीकडून पिकाचे नुकसान होऊ न ही मदत मिळत नसल्यामुळे रामेश्वर रकटे वारंवार काळजी करत होता. शासनाची मदत मिळत नाही. आणि पीकही गेले असा तो वारंवार बोलत होता.

एकीकडे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर बीड जिल्ह्यात पाहणी करत असताना दुसरीकडे राजेगाव मधील या तरुण शेतकरी मुलाने आत्महत्या केली. मागील दोन दिवसांपासून कापसाच्या शेतातील पाणी साचलेल व्हिडिओ याच राजेगावतून आलेला आहे. तो व्हिडिओ पाहून मोठ्या प्रमाणावर हळहळ होत होती. मात्र आज याच गावातील तरुण शेतकरी मुलाचा धीर सुटल्याने त्याने आत्महत्या करत आपले जीवन संपवले.

रामेश्वर रकटे

Tagged