न्यूज ऑफ द डे

जयदत्त क्षीरसागर आणि शिवसेनेचा सबंध नाही

By Keshav Kadam

October 22, 2022

जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांची माहिती बीड दि.22 : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि जयदत्त क्षीरसागर यांचा काहीही सबंध नसल्याचे शेवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी शनिवारी (दि.22) पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले. जिल्ह्यात शिवसेनेचे काम करत असताना जयदत्त क्षीरसागर यांनी कुठल्याही कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांचा फोटो टाकला नाही. मुंबईत जाऊन त्यांची कधी भेट घेतली नाही. नुकत्याच केलेल्या उद्घाटनात कुठेही त्यांचा उल्लेख केला नाही. ही खंत वाटल्यामुळे यापुढे त्यांचा शिवसेनेशी काहीही संबंध नाही, व येणाऱ्या निवडणुका आम्ही आमच्या ताकदीवर लढवणार आहोत असेही जगताप म्हणाले. तसेच सर्व पदाधिकारी यांनी त्यांच्यासाठी प्रामाणिकपणे काम केले. अनेकांचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात आम्ही प्रतेक निवडणूक लढवणार आहोत. असेही जगताप म्हणाले. यावेळी संपर्क प्रमुख धोंडू पाटील, जिल्हाप्रमुख अनिल जगताप, अप्पासाहेब जाधव, बाळासाहेब पिंगळे, परमेश्वर सातपुते, विलास महाराज शिंदे, दिलीप गोरे, सुनील सुरवसे, सागर बहिर यांची उपस्थिती होती.