न्यूज ऑफ द डे

पिंपळगाव येथील नदीला आलेल्या पुरात वाहुन गेलेल्याचा मृतदेह सापडला.

By Keshav Kadam

October 27, 2022

पाण्याचा प्रवाह कमी होताच सापडला आकाश आरगडे चा मृतदेह

अशोक गलांडे । सिरसाळा

नदीला आलेल्या पुरामध्ये एक तरुण वाहून गेल्याची घटना सहा दिवसापूर्वी परळी तालुक्यातील गाडेपिंपळगाव येथे घडली होती. पोलीसांसह विविध यंत्रणेच्या माध्यमातून शोध घेवूनही मृतदेह आढळून येत नव्हता. त्यामुळे आता मृतदेहाच्या शोधासाठी ड्रोनचा वापरही करण्यात आला. मात्र पाणी खुप असल्याने शोध यंत्रणेला यश येत नव्हते शेवटी आज सकाळी पाण्याचा प्रवाह कमी झाल्याने सकाळी दहा वाजता मृतदेह आढळून आला

आकाश आरगडे हा युवक नदीच्या पुरामध्ये वाहून गेला होता. त्याचा सर्वत्र शोध घेतला मात्र तो सापडत नसल्यानें गेल्या काही दिवसांपूर्वी माजलगाव धरणात एक व्यक्ती बुडाला होता. त्याचा शोध काही तासांमध्ये घेण्यात आला. त्यापद्धतीने सदरील तरुणाचा शोध घेण्याची मागणी केली कुटुंबांनी केली होती. आकाश आरगडे यांचा मृतदेहाचे शवविच्छेदन सापडलेल्या ठिकाणींच सूरू असून अंत्यविधीही तिथेच होणार असल्याची माहिती नायब तहसीलदार बाबुराव रुपणरयांनी दिली.