क्राईम

राज्यस्तरीय खटोड कीर्तन महोत्सवात आईला स्टेजवर जागा पण घरात नाही

By Keshav Kadam

November 09, 2022

echo adrotate_group(3);

गौतम खटोड यांची आई, भाऊ, पुतण्याला हिन वागणूक; पत्रकार परिषदेत आईने मांडल्या व्यथा echo adrotate_group(6);

बीडदि.9 ः दोन दशकापासून बीडमध्ये राज्यस्तरीय कीर्तन महोत्सव घेणारे स्व.झुंबरलालजी खटोड प्रतिष्ठाण आहे. या प्रतिष्ठाणच्या माध्यमातून समाजाला नियतीचे डोस पाजणारे गौतम खटोड मात्र घरात कुटूंबीयांना हिन वागणूक देत आहेत. रात्रीच्या बारा वाजता आईला घराच्या बाहेर काढत आहेत. भावाला, पुतण्याला नाहक त्रास देत असल्याच्या व्यथा कुटूंबीयांनी पत्रकारांसमोर मांडल्या. बुधवारी (दि.9) खटोड इंडस्ट्रीज येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी गौतम खटोड यांच्या आई निर्मला खटोड, भाऊ सुशील खटोड, पुतण्या अशिष खटोड यांची उपस्थिती होती.

echo adrotate_group(9);

बदनामीला मी घाबरतनाही- गौतम खटोड

पत्रकार परिषदेनंतर गौतम खटोड यांनीही पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, मी आतापर्यंत त्याला खुप सांभाळून घेतलेले आहे. परंतू त्याच्यात सुधारणाच होत नाही. प्रॉपर्टी तो अर्धी मागत असेल पण मी 51 टक्के द्यायला तयार आहे. त्याने केलेले आरोप खोटे असून माझ्यावर खुप बदनामीचे घाव झालेले आहेत. मी या गोष्टीला घाबरत नसल्याचेही गौतम खटोड म्हणाले. विशेष म्हणजे सुशील खटोडांच्या पत्रकार परिषदेचे निमंत्रण, विरोधात आलेल्या बातम्या स्वतः गौतम खटोड दिवसभर सोशल मीडियावर व्हायरल करत होते. त्यामुळे नेमका काय प्रकार सुरु आहे, हे कुणाच्याच लक्षात येत नव्हते. echo adrotate_group(10);