क्राईम

आश्चर्य ना!नांदेडच्या दारुबंदी विभागाकडून राजुरीतील बनावट दारु कारखाना उद्धवस्त

By Keshav Kadam

November 15, 2022

बीडच्या दारुबंदी विभागाला कारवाईची भनक सुद्धा नाही

केशव कदम | बीड

शिदोड पसिरातील बनावटदारु कारखान्याशी कनेक्शनकाही दिवसापुर्वीच स्थानिक गुन्हे शाखेने बीड तालुक्यातील शिदोड परिसरात बनावट दारु कारखान्यावर कारवाई केली होती. त्यानंतर बीड ग्रामीण पोलीसांनी तपासाचे चक्रे गतीमान करत बनावट दारु तयार करणारे, त्यासाठी साहित्य पुरवणारे व दारुची विक्री करणारे अशी पूर्ण साखळीच पकडली होती. नांदेड राज्य उत्पादन शुल्क विभागाने पकडलेला आरोपी हा शिदोड येथील आरोपींचा जवळचा नातेवाईक आहे. सर्वांच्या संगनमतानेच कारखाने चालत असल्याची माहिती आहे.

दारु माफिया रडारवरराजुरी परिसरात टाकलेल्या छाप्यात नांदेड राज्य उत्पादन शुल्क विभागाला फक्त साहित्य मिळाले आहे. परंतु अद्याप अटक कुणालाही झालेली नाही. या कारखान्यामध्ये आकश जाधवला सहकार्य करणार्‍या सर्वांना ताब्यात घेतले जाणार आहे. त्यामुळे या कारखाना संबंधित असलेले दारु माफिया नांदेड राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या रडावर आहेत.

एकास ताब्यात घेतले असून कारखाना उद्ववस्त केलेला आहे. तपास सुरु असल्यामुळे आरोपींची नावे सांगता येणार नाहीत. मोठी साखळी असल्याचे आमच्या निदर्शनास आले असून त्या दिशेने तपास सुरु आहे.-अनिल पिकलेदुय्यम निरीक्षक, राज्य उत्पदन शुल्क विभाग नांदेड