क्राईम

खुनातील आरोपीने भरधाव जीपची स्टेरींग फिरवली; अधिकाऱ्यांसह सातजण जखमी

By Keshav Kadam

November 28, 2022

जखमी अधिकारी कर्मचारी यांच्या बाबत चौकशी करताना अप्पर अधीक्षक सचिन पांडकर

बीड दि.28 : खून प्रकरणाच्या स्थळ पंचनामा करण्यासाठी जात असताना आरोपीने चालू गाडीचे स्टेरिंग फिरवली. यामुळे वेगात असलेली गाडी खड्यात जाऊन कोसळली. या अपघातात पोलीस अधिकारी, कर्मचारी व पंच असे 6 ते 7 जण जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी (दि.28) दुपारच्या सुमारास मांजरसुंबा पाटोदा रोडवरील सासेवाडी फाटा येथे घडली. जखमीवर बीड येथील लोटस हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी रुग्णालयात धाव घेतली.

अपघातातील कारची पाहणी करताना पोलीस

नेकनूर पोलीस ठाणे हद्दीतील मुळकवाडी येथे दोन दिवसापूर्वी चुलत्याचा कोयत्याने खून केला होता. या खुनातील आरोपी रोहिदास निर्मळ यास पंचनामेसाठी घेऊन जात असताना आरोपीने जीपची स्टेरिंग फिरवली. या अपघातात नेकनूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मुस्तफा शेख, पोलीस हवालदार बाबासाहेब खाडे, देशमुख आरोपी रोहिदास निर्मळ पंचचनाम्यासाठी सोबत आलेले पंच असे पाच ते सहा जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने बीड येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

खून प्रकरणातील जखमी आरोपी रोहिदास निर्मळ