CHANDRAKANT PATIL

न्यूज ऑफ द डे

चंद्रकांत पाटलांवर CHANDRAKANT PATILपुण्यात शाईफेक

By Balaji Margude

December 10, 2022

प्रतिनिधी । पुणेदि.10 : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील CHANDRAKANT PATIL यांच्यावर शाईफेक करण्यात आल्याची धक्कादायक घटना पुण्यातील पिंपरी भागात घडली आहे. चंद्रकांत पाटील यांनी काल भाषण करताना महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याविषयी बोलताना वादग्रस्त विधान केलं होतं. शिक्षणाचा प्रचार करण्यासाठी महापुरुषांनी भीक मागतल्याचं ते म्हणाले होते. त्यामुळे त्यांच्याविरोधात सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत होता. त्यांच्या वक्तव्यावर सर्वत्र टीका झाल्यानंतर त्यांनी आपल्या वक्तव्यावर सारवासारव केली होती. पण त्याचे पडसाद आता राज्यभरात उमटताना दिसत आहे. त्यांच्यावर पिंपरीत शाईफेक करण्यात आलीय. या घटनेने राज्यात खळबळ उडाली आहे.