न्यूज ऑफ द डे

नवगण राजुरी ग्रा.पं.वर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व

By Shubham Khade

December 20, 2022

जयदत्त क्षीरसागरांना पुतण्या आ.संदीप क्षीरसागरांकडून धक्का

बीड : आ.संदीप क्षीरसागर यांनी नवगण राजुरीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा पुन्हा फडकवला आहे. सरपंच पदाच्या उमेदवार मंजुषा बनकर विजयी झाल्या आहेत.

आमदार संदीप क्षीरसागर यांना नवगण राजुरीचा गड एकहाती राखण्यात यश आले. त्यांचे सर्वच्या सर्व 13 उमेदवार विजयी झाले आहेत. सरपंच पदाच्या उमेदवार मंजुषा बनकर विजयी झाल्या आहेत‌. त्यामुळे जयदत्त क्षीरसागर गटाला धक्का बसला आहे. या विजयाचा आनंदोत्सव गावासह बीडमध्ये देखील समर्थकांनी केला आहे. विजयानंतर आमदार संदीप क्षीरसागर म्हणाले, गणपती बाप्पाच्या आशिर्वादाने तालुक्यातील नवगण राजुरीकरांनी प्रथम विजयाची गुढी उभा केली. स्व. काकु -नानांचा आशीर्वाद आणि आईच्या मायाचे ऊब देत गावकऱ्यांनी पुन्हा एकदा रविंद्रदादांच्या लेकावर विश्वास ठेवला. हे ऋणानुबंध मी कायम विकासाच्या माध्यमातून जपत राहिलं असा विश्वास देतो. राजुरीसह अनेक ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात आल्या आहेत. अजुनही काही निकाल बाकी आहेत. हा विजय केलेल्या विकास कामांचा आहे. सर्व मतदारांनी मतदार संघात पहिली पसंती राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनलला दिली. त्याबद्दल समस्त गावकरी, माता-भगिनीं, बंधू, मतदार यांचे जाहीर आभार व्यक्त करतो, असे आमदार संदीप क्षीरसागर यांनी म्हटले आहे.