grampanchayat

अंबाजोगाई

बजरंग सोनवणेंचे खंदे समर्थक शंकर उबाळे पराभूत

By Shubham Khade

December 20, 2022

सनगावमध्ये राष्ट्रवादीला धक्का

अंबाजोगाई : तालुक्यातील सनगाव येथील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांचे खंदे समर्थक आणि माजी जिल्हा परिषद सदस्य शंकर उबाळे यांचा सनगाव ग्रामपंचायत निवडणुकीतील सरपंच पदाच्या लढतीत ६ मतांनी पराभव झाला आहे. त्यांच्या विरोधात अनंत रघुनाथ अंजाण हे सरपंच पदी निवडून आले आहेत. त्यांचे ४ तर उबाळे यांचे ५ ग्रामपंचायत सदस्य विजयी झाले आहेत.