कार-ट्रॉलीच्या भीषण अपघातात तिघे ठार

अंबाजोगाई क्राईम न्यूज ऑफ द डे

अंबाजोगाई तालुक्यातील मोरवाडी पाटीजवळ अपघात

प्रतिनिधी | अंबाजोगाई
दि.२१ : भरधाव वेगातील कार उसाच्या ट्रॉलीला पाठीमागून धडकली. या भीषण अपघातात तिघे जण जागीच ठार झाले. तालुक्यातील बर्दापूर पोलीस ठाणे हद्दीतील मोरवड पाटीजवळ आज (दि.२१) सायंकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला.

अंबाजोगाईकडून लातूरकडे भरधाव वेगात चाललेल्या कारने (एम.एच. ४४ यु ०६४७) ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॉलीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात कारमधील तीन तरुण जागीच ठार झाले आहेत. अपघात इतका भीषण होता की कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. घटनास्थळावरून मृतदेह अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात पाठवण्यात आले. दरम्यान, मृत तिघे परळीच्या असून रात्री उशिरापर्यंत त्यांची नावे समजली नव्हती.

Tagged