dhananjay-munde

न्यूज ऑफ द डे

आ.धनंजय मुंडेंच्या वाहनाला अपघात

By Shubham Khade

January 04, 2023

परळीत घडली घटना; सर्वजण सुखरूप

परळी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांच्या वाहनाला मंगळवारी मध्यरात्री साडेबारा वाजता अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने वाहनातील सर्वजण सुखरूप आहेत.

आमदार धनंजय मुंडे यांच्या प्रसिद्ध विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंडे हे मंगळवारी दिवसभर मतदारसंघातील कार्यक्रम व भेटी आटोपून परळीकडे परतताना रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास परळी शहरात त्यांच्या वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने छोटासा अपघात झाला. यात मुंडे यांच्या छातीला किरकोळ मार लागला असून डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. काळजी करण्यासारखे काही नाही, कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांनी केले आहे.