धनंजय मुंडेंना एअर ॲम्बुलन्सने मुंबईला हलविणार

न्यूज ऑफ द डे परळी बीड

छातीला मार लागला; अपघातात कार चक्काचूर

परळी : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या कारला परळीमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास अपघात झाला आहे. यामध्ये मुंडे यांच्या कारचे मोठे नुकसान झाले आहे. मुंडे यांच्या छातीला मार लागल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे त्यांना एअर ॲम्बुलन्सने मुंबईला हलविले जात असल्याची माहिती समोर आली आहे.

परळी शहरातील मौलाना आझाद चौकात हा अपघात झाला आहे. मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या भेटी आणि कामे आटपून धनंजय मुंडे घरी जात असताना चालकाचा कारवरील ताबा सुटला आणि हा अपघात झाला आहे. याची माहिती धनंजय मुंडे यांनीच सकाळी दिली होती. अपघातात धनंजय मुंडे यांच्या बरगड्यांना दोन ठिकाणी मार लागला असून पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात नेले जाणार आहे. यासाठी लातूरहून एअर ॲम्बुलन्सची व्यवस्था केली जात आहे. दरम्यान अपघातात कार चक्काचूर झाली आहे.

Tagged