केज

नांदूरघाट पसिरात दारु, मटका, गुटखा अन् जुगारावरही कारवाई

By Keshav Kadam

January 11, 2023

echo adrotate_group(3);

केज पोलीसात गुन्हा नोंद; पाच लाखांचा मुद्देमाल जप्तबीड दि.11 : केज तालुक्यातील नांदूरघाट परिसरामध्ये अवैध दारु, मटका, गुटखा अशी अवैध धंदे सर्रास सुरु असल्याची माहिती सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना मिळाली. त्यांच्या पथकाने एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी धाड टाकत अवैध दारु, मटका, गुटखा अशा कारवाया करत मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी नांदूरघाट चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. echo adrotate_group(6);

echo adrotate_group(5);

वाघे बाभळगाव येथे कल्याण मटका घेणार्‍या संतोष वाघ यास ताब्यात घेतले. त्याकडून जुगाराचे साहित्य रोख रक्कम असा 15 हजार 480 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यानंतर हॉटेल जगदंबा येथे अवैध दारु विक्री करताना आढळून आली. या प्रकरणी संकर्ण हवाले यास ताब्यात घेवून त्याकडून 6 हजार 425 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. नांदूर येथे सय्यद रफिक हा गुटखा विक्री करत असल्याची माहिती मिळाली. त्यास ताब्यात घेत त्याच्या जवळ असलेल्या इंडिका कारमध्ये (एमएच-23, डी-3426) राजनिवास, विमल, गोवा असा 85 हजारांचा गुटखा आढळून आला. कारसह 4 लाख 35 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच नांदूरघाट ग्रामपंचायतजवळ बाळू दळवी जुगाराचे आकडे घेताना आढळून आला. त्यास ताब्यात घेत जुगाराचे साहित, रोख रक्कम असा 9 हजार 330 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी सर्व आरोपींवर केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर अधीक्षक सचिन पांडकर, कविता नेरकर यांच्यासह सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली पोह.बाबासाहेब बांगर, बालाजी दराडे, राजू वंजारी, पोना.विकास चोपणे, सचिन अहंकारे, संजय टूले, यांनी केली.echo adrotate_group(9); echo adrotate_group(1);