Site icon कार्यारंभ लाईव्ह

बस-ट्रकच्या भिषण अपघातात 10 जण जागीच ठार

bus accident
echo adrotate_group(3);

नाशिक- अंबरनाथहून साईंच्या दर्शनासाठी चाललेल्या एका भाविकांच्या बसला भीषण अपघात accident झाला ज्यामध्ये तब्बल 10 साई भक्तांचा जागीच मृत्य झाल्याची धक्कादायक घटना सिन्नर शिर्डी रोडवरील पाथरे गावाजवळ घडली आहे. खासगी लक्झरी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली ज्यामध्ये बसचा अक्षरश: चुराडा झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, त्यात दहा जणांचा मृत्यू झाला.echo adrotate_group(6);


पाथरे येथील ईशानेश्वर मंदिराजवळ बसचा हा अपघात झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला असून त्यात 6 महिला, 2 पुरुष आणि 2 लहान मुलांचा समावेश आहे. तर 15 हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. अंबरनाथ येथील लक्ष्मीनारायण पॅकेजिंग कंपनी तर्फे त्यांचे कामगार व कुटुंबीयांना एकूण पंधरा बसेस द्वारे दर्शनाला जात असल्याचे समजते. त्यापैकी अपघात झालेली ही बस पाचव्या क्रमांकाची आहे असे समजते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उल्हासनगरहून साई दर्शनासाठी निघालेल्या 15 बसपैकी ही एक बस होती. ही बस गुरुवारी रात्री शिर्डीसाठी निघाली होती. पण शुक्रवारी पहाटेच्या सुमारा साई भक्तांच्या या बसला भीषण अपघात झाला. ज्यामध्ये 10 जणांचा मृत्यू झाला. तर बसमधील बहुतांश प्रवासी हे गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. या बसमध्ये सुमारे 50 लोक होते.echo adrotate_group(5);


दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले असून मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आलं. त्यानंतर जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
मुंबई येथून शिर्डीकडे जाणारी खाजगी आराम बस क्रमांक एमएच 04- एसके-2751 आणि शिर्डी बाजूकडून सिन्नरकडे जाणारा माल ट्रक यांची समोरासमोर धडक होऊन हा आपघात झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उल्हासनगरहून साई दर्शनासाठी निघालेल्या 15 बसपैकी ही एक बस होती. ही बस गुरुवारी रात्री शिर्डीसाठी निघाली होती. पण शुक्रवारी पहाटेच्या सुमारा साई भक्तांच्या या बसला भीषण अपघात झाला. ज्यामध्ये 10 जणांचा मृत्यू झाला. तर बसमधील बहुतांश प्रवासी हे गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. या बसमध्ये सुमारे 50 लोक होते.echo adrotate_group(9);

मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश
नाशिक शिर्डी महामार्गावर आज पहाटे वावी पाथरे गावाजवळ झालेल्या खासगी बसच्या अपघातासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपये देण्याचे आणि जखमींवर शासकीय खर्चाने आवश्यक ते उपचार करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. या अपघाताचे वृत्त कळताच मुख्यमंत्र्यांनी नाशिक विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकार्‍यांशी चर्चा करून याविषयी अधिक माहिती घेतली echo adrotate_group(10);

Exit mobile version