बीड

प्रदीप सोळुंके यांची राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून हकालपट्टी

By Shubham Khade

January 16, 2023

सरचिटणीस शिवाजीराव गर्जेंची माहिती; शिक्षक मतदार संघ निवडणुकीत बंडखोरी

बीड : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ता सेलचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप सोळुंके यांनी मराठवाडा शिक्षक मतदार संघातील निवडणुकीत त्यांनी बंडखोरी केली आहे. पक्ष शिस्तीचा भंग केल्याचा ठपका ठेवत सोमवारी (दि.१६) त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी ही माहिती दिली आहे.

पत्रात पुढे म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्यातील विधान परिषद शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघात विक्रम वसंतराव काळे यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीकडून अधिकृतरीत्या उमेदवारी देऊन ‘एए’ व ‘बीबी’ फॉर्म ही त्यांनी भरून ते राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे उमेदवार घोषित झालेले आहेत. तसेच ते महाविकास आघाडीचेही उमेदवार आहेत. तरीही प्रदीप सोळुंके यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरुध्द अर्ज भरून दि.१६ जानेवारी २०२३ या शेवटच्या दिवशी त्यांना कळवूनही अर्ज मागे न घेतल्यामुळे पक्षशिस्तीचा भंग केलेला आहे. म्हणून त्यांची पक्षातून तत्काळ हकालपट्टी करण्यात येत आहे, असे म्हटले आहे.