भाजप नेत्यांकडूनच पंकजा मुंडेंच्या बदनामीचा कट रचला जातोय!

न्यूज ऑफ द डे बीड महाराष्ट्र

चंद्रशेखर बावनकुळेंचा गौप्यस्फोट; पंकजा पक्षावर नाराज नाहीत

जालना : भाजपच्याच नेत्यांकडून पंकजा मुंडेंच्या बदनामीचा कट रचला जातोय, असा गौप्यस्फोट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. ते जालना येथे शनिवारी पत्रकारांशी बोलत होते.

भाजपमध्येच एक युनिट आहे. या युनिटकडून पंकजा मुंडे आणि भाजपला बदनाम केले जात आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत. हे कोणते युनिट आहे किंवा कोणत्या नेत्यांकडून पंकजा मुंडेंची बदनामी केली जात आहे, हे चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले नाही. मात्र, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या गौप्यस्फोटामुळे खळबळ उडाली आहे. यावर अद्याप पंकजा मुंडे यांची भूमिका समजू शकली नाही. मात्र, पंकजा मुंडेंची बदनामी करणारे भाजप नेते कोण?, असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे.

Tagged