माजलगावात चार लाखाचा गुटखा जप्त

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड

आयपीएस धीरजकुमार बच्चू यांची कारवाई

माजलगाव : तालुक्यातील आनंदगाव शिवारातील आनंदगाव ते मोगरा या रस्त्यावरील एका कोठ्यामध्ये प्रतिबंधित गुटख्याची ३ लाख ९१ हजार रुपये किमतीचा गुटखा साठवणूक केल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर तिथे छापा मारून तो जप्त केल्याची कारवाई सोमवारी रात्री १२.३० वाजता आयपीएस.डॉ. धिरज कुमार यांच्या पथकाने केली.

आयपीएस. डॉ.धिरज कुमार यांनी माजलगाव उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचा चार्ज घेतल्या पासूनच गुटखा माफिया विरुद्ध कारवाई धडक मोहीम राबवत धाडसत्र सुरू ठेवले आहे. मागे दोन दिवसापूर्वी ३६ लाखाचा गुटखा जप्त करत आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. त्यातच आज दि.२३ सोमवारी आनंदगाव शिवारातील आनंदगाव-मोगरा या रस्त्यावरील कोठ्यामध्ये गुटखा असल्याची माहिती पथकाला माहिती मिळाली. यावरून रात्री १२.३० वाजता पोलीस कॉन्स्टेबल अस्तीकुमार देशमुख, वाय.बी.चव्हाण, साधु कोकाटे यांनी छापा मारून बाबाजी गुटखा ज्याची किंमत ३ लाख ९१ हजार जप्त केला. याबाबत तपास सुरू असून दिंद्रुड सदरील माल पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिला असून पुढील कारवाई सुरू आहे.

Tagged