suicide

क्राईम

गेवराईतील एकाच कुटूंबातील सात जणांचे दौंड येथे नदीपात्रात मृतदेह!

By Keshav Kadam

January 24, 2023

echo adrotate_group(3);

घातपाताच संशय; घटनेने खळबळबीड दि.24 : दौंड तालुक्यातील पारगाव सा.मा. येथील भीमा नदीपात्रात 8 ते 24 जानेवारी दरम्यान दोन कुटुंबातील सात जणांचे मृतदेह सापडले आहेत. आई, वडील, मुलगी, जावई आणि तीन नातवांचा यामध्ये समावेश आहे. हा घातपात आहे की आणखी काही याची चर्चा परिसरात सुरू आहे. हे कुटूंब गेवराई तालुक्यातील खामगाव येथील असून कामानिमित्त परजिल्ह्यात गेले होते.echo adrotate_group(7);

echo adrotate_group(8);

24 जानेवारी रोजी दुपारी रितेश शामराव फुलवरे (वय 8 वर्ष), छोटू फुलवरे (वय पाच वर्ष) तर कृष्णा फुलवरे (वय तीन वर्ष) या मुलांचे मृतदेह सापडले. तर 18 ते 24 जानेवारी रोजी दुपारी एक वाजेपर्यंत पारगाव सा. मा. (ता. दौंड) येथील भीमा नदीपात्रात मोहन उत्तम पवार (वय 50), संगीता मोहन पवार (वय 45), शामराव पंडित फुलवरे (वय 32), राणी शामराव फुलवरे (वय 27) आणि रितेश शामराव फुलवरे (वय 7) यांचे मृतदेह भीमा नदीपात्रात आढळून आले. मयत मोहन पवार व संगीता पवार हे मृत शामराव फुलवरे यांचे सासू- सासरे आहेत. तसेच शामराव व राणी फुलवरे यांना तीन मुले असून मंगळवारी दुपारी सापडलेले तीन मुलांचे मृतदेह हे मयत शामराव फुलवरे यांच्या मुलांचे आहेत. मोहन पवार हे खामगाव (ता. गेवराई, जि. बीड) येथील असून शामराव फुलवरे हे येळंब (ता. जि. बीड) येथील आहेत. सध्या हे सर्व जण कामधंद्यामुळे निघोज (ता. शिरूर) येथे रहात असल्याची माहिती शामराव फुलवरे यांचे मेहूणे दीपक शिंदे यांनी दिली. नदीपात्रात मृतदेह सापडण्याच्या या सत्रामुळे पुणे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. 23 जानेवारी रोजी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी भीमा नदीपात्रातील ठिकाणी भेट देऊन पहाणी केली. निरीक्षक हेमंत शेडगे व पोलीस कर्मचारी यावेळी उपस्थित होते. शोध पथकाने मृतदेह बाहेर काढल्यानंतर हा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. दरम्यान या घटनेत घातपाताची शक्यता असून पोलीसांनी याचा सखोल तपास करावा. जोपर्यंत तपास होणार नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे मयताचे नातेवाईक दीपक शिंदे यांनी सांगितले आहे. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहेecho adrotate_group(9); echo adrotate_group(10);