voice of media

बीड

सकारात्मक पत्रकारितेसाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ कडून लाखोंचे पुरस्कार VOICE OF MEDIA

By Balaji Margude

January 28, 2023

echo adrotate_group(3);

– चला बदल घडवू ः राज्यातील पत्रकारांसाठी स्पर्धा– महिला पत्रकारांसाठी 51 हजारांचे खास बक्षीस– राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत मुंबईत होणार दिमाखदार सोहळा

प्रतिनिधी । बीडदि.28 : सकारात्मक पत्रकारिता केली तर पत्रकारितेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल, ही मराठी पत्रकारितेची विचारधारा आहे. सकारात्मक पत्रकारिता हा विचार रुजवण्यासाठीच ‘व्हाईस ऑफ मीडिया’ या पत्रकारांच्या संघटनेची निर्मिती झाली आहे. जी संघटना सध्या देशात 23 राज्यांत कार्यरत आहे. ‘पॉझिटिव्ह जर्नालिझम’ अजून रुजावे, या उद्देशाने या वर्षीपासून ‘व्हाईस ऑफ मीडिया’ VOICE OF MEDIA पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड सुरू केला आहे. या स्पर्धेत रोख अडीच लाख रुपयांचे चार पुरस्कार, विशेष पाच पुरस्कार, सर्व सहभागी स्पर्धक पत्रकारांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. ‘व्हाईस ऑफ मीडिया’चे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, राष्ट्रीय सरचिटणीस चंद्रमोहन पुपाला, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजा माने, शेट ब्रिजमोहन लढ्ढा सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष आशीष ब्रिजमोहन लढ्ढा, यांनी ‘व्हाईस ऑफ मीडिया’ पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2023 ची मुंबईत घोषणा केली आहे. या घोषणेची माहिती व्हॉईस ऑफ मीडियाचे राज्य उपाध्यक्ष संजय मालाणी, राज्य कार्यवाहक तथा बीड जिल्हा अध्यक्ष बालाजी मारगुडे, जिल्हा कार्याध्यक्ष दिनेश लिंबेकर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.‘व्हाईस ऑफ मीडिया’ कोकण विभागीय कार्यालय एल.30-1201- स्वप्नपूर्ती , सेक्टर 36 खारघर, नवी मुंबई 410210 या पत्त्यावर प्रस्ताव पाठवायचे आहेत. ‘व्हाईस ऑफ मीडिया’चे सर्व ठिकाणचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष, सचिव या प्रमुख चार पदाधिकार्‍यांना स्पर्धेमध्ये सहभागी होता येणार नाही.   शेट ब्रिजमोहन लढ्ढा सेवा प्रतिष्ठान चिखलीचे अध्यक्ष आशीष ब्रिजमोहन लढ्ढा यांच्या सहकार्याने हा पुरस्कार उपक्रम पार पडतोय. आशीष ब्रिजमोहन लढ्ढा म्हणाले, या सामाजिक उपक्रमात मला सहभागी होता आले, हे मी माझे भाग्य समजतोय, हा उपक्रम नक्कीच समाजासाठी प्रेरक ठरेल. या स्पर्धेत राज्यातल्या सर्व पत्रकारांनी सहभागी व्हावे, असे आवाहान ‘व्हाईस ऑफ मीडिया’च्या वतीने संघटनेचे जालींदर धांडे, प्रभात बुडूख, उदय नागरगोजे, केशव कदम, अमोल जाधव, भागवत जाधव, विनोद जिरे, गणेश सावंत रांजणीकर, सुनील यादव, अनंद वैद्य, अनिल जाधव, एजाज शेख, अमोल मुळे, ज्ञानेश्वर वायबसे, शुभम खाडे, संजय तिपाले, शिरीष शिंदे, मुकेश झणझणे, माजलगाव तालुकाध्यक्ष वैजेनाथ घायतिडक, परळी तालुकाध्यक्ष स्वानंद पाटील, अंबाजोगाई तालुकाध्यक्ष प्रदीप तरकसे, केज तालुकाध्यक्ष प्रा. हनुमंत सौदागर, बीड तालुकाध्यक्ष अशोक शिंदे, धारूर तालुकाध्यक्ष सचिन थोरात, गेवराई तालुकाध्यक्ष विनोद पौळ, शिरूर तालुकाध्यक्ष अशोक शिंदे यांच्यासह इतर पदाधिकार्‍यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी www.voiceofmedia.org (व्हॉईसऑफमीडियाडॉटओआरजी http://www.voiceofmedia.org) या वेबसाईटला भेट द्या.असे आहे बक्षीसाचे स्वरूप‘व्हाईस ऑफ मीडिया’ पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2023 प्रथम क्रमांक 1 लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह, ग्रंथ, मानपत्र, सन्मान. द्वितीय क्रमांक 61 हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, ग्रंथ, मानपत्र, सन्मान. महिला पत्रकार 51 हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, ग्रंथ,मानपत्र, सन्मान. तृतीय क्रमांक 41 हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, ग्रंथ, मानपत्र, सन्मान. सहभागींना उत्तेजनार्थ पाच विशेष पुरस्कार. स्पर्धेत भाग घेणार्‍या सर्वांना सहभागी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.echo adrotate_group(6);

स्पर्धेसाठीच्या अटीस्पर्धेत सहभागी होणारे पत्रकार त्या दैनिक, साप्ताहिकाचे प्रतिनिधी असणे आवश्यक आहेत. प्रस्ताव देताना संपादकांचे पत्र जोडणे आवश्यक आहे. 1 फेब्रुवारी 2023 ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीमध्ये किमान 42 किंवा त्यापेक्षा अधिक थेट परिणामकारक असणार्‍या बातम्या, लेख यास्पर्धेसाठी ग्राह्य धरल्या जातील. जानेवारी 2024 मध्ये राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मुंबईत विजेत्यांना दिमाखदार सोहळ्यात पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.echo adrotate_group(5);

बीड जिल्ह्यातून बालाजी मारगुडे निवड समितीवरही स्पर्धा महाराष्ट्र, मराठी भाषेपुरतीच आहे. ‘व्हाईस ऑफ मीडिया’चे वरिष्ठ व मुख्य पदाधिकारी मंदार फणसे, संजय आवटे, धर्मेंद्र जोरे, अनिल मस्के, विलास बडे, सुधीर चेके पाटील, बालाजी मारगुडे हे निवड प्रक्रियेचे प्रमुख म्हणून काम पाहणार आहेत.  echo adrotate_group(9); echo adrotate_group(10);