accident

क्राईम

माजलगाव तेलगाव रोडवर भीषण अपघातात तीन ठार!

By Keshav Kadam

February 01, 2023

माजलगाव दि.1 : माजलगाव ते तेलगाव रोडवरील शिंदेवाडी फाट्याजवळ बुधवारी (दि.1) रात्री8.30 च्या सुमारास स्विफ्ट कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात लहामेवाडी येथील तिघांचा जागीच मृत्यू झाला.

माजलगाव तालुक्यातील लहामेवाडी येथील लक्ष्मण सुभाष कापसे (वय 32), नितीन भाऊसाहेब हुलगे (वय 30) व आण्णासाहेब बळीराम खटके हे तेलगाव येथील कापूस जिनिंगवर कामासाठी जातात. काम आटोपून बुधवारी रात्रीच्या सुमारास ते तेलगावहून गावी लहामेवाडीकडे परतत होते. माजलगाव-तेलगाव रोडवर माजलगावकडून येणार्‍या स्विफ्ट कारने (एम.एच.04,जी.डी.1995) जोराची धडक दिली. या भीषण अपघातात लक्ष्मण कापसे, आण्णासाहेब खटके यांचा जागीच मृत्यू झाला. तर नितीन हुलगे यास उपचारार्थ माजलगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. एकाच गावातील तिघांचा अपघातात मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.