prakash solanke

भाजपातच काय शिंदे गटातही जाऊ – आ.प्रकाश सोळंके prakash solanke

बीड

माजलगाव, दि.13 : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मंत्रिपदावर संधी न दिल्याने नाराज असलेले माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके prakash solanke हे भाजपात जाणार असल्याची जोरदार चर्चा मागील काही महिन्यांपासून माजलगावात सुरू आहे. आज या चर्चेवर खुद्द आ. सोळंके यांनीच प्रतिक्रीया दिली. ते म्हणाले, मतदार म्हणत असतील की मी भाजपात जाणार आहे तर नक्कीच विचार करावा लागेल. भाजपातच काय पण शिंदे गटातही जाईल. जो काही निर्णय घ्यायचा तो मतदारसंघातील जनतेला विचारूनच निर्णय घेईल, असे विधान सोळंके यांनी बीड जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. माजलगावात आयोजित पत्रकार परिषदेत एका प्रश्नाच्या उत्तरात ते बोलत होते.

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोघांनी जेव्हा पहाटेचा शपथविधी घेतला त्यावेळी आ. सोळंके चर्चेत आले होते. अजित दादांनी केलेलं बंड शरद पवार यांना विचारल्याशिवाय झालेलं नाही, असे ते म्हणाले होते. त्यानंतर महाविकास आघाडी सत्तेवर आली. माझी यावेळी शेवटची निवडणूक असून पक्षाने मला मंत्रिपदावर संधी द्यावी, असे सोळंके वारंवार पक्षाला म्हणत होते. मात्र पक्षाने त्यांना मंत्रिपदावर संधी दिली नाही. त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा होती. गेल्या अनेक महिन्यांपासून ते देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्याही संपर्कात होते. आता तर राज्यात सत्ता परिवर्तन झाले आणि एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सत्तेवर आले. त्यामुळे आ.सोळंके यांची या दोघांशी जवळीक वाढल्याचे बोलले जात आहे. त्यातच आज माजलगावात त्यांनी पत्रकार परिषद घेऊन एकनाथ शिंदे चांगले काम करत असल्याचे म्हटले आहे. मात्र मी पक्ष बदलणार ह्या केवळ वावड्या असून माझे भाजपातील विरोधकच या वावड्या उठवत आहेत, जो काही निर्णय घ्यायचा तो मतदारांना विचारून घेईल, असेही ते म्हणाले. शिवाय त्यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांचंही तोंडभरून कौतूक केलं आहे.

https://www.lokmat.com/beed/if-the-people-want-we-will-go-back-to-bjp-ncp-mla-prakash-solanke-spoke-clearly-a320/
Tagged